घरात पाल फिरताना दिसली की एकच धावपळ उडते. तिला पळवण्यासाठी काट्या, झाडू असी अस्त्र बाहेर येतात. पण ती कुठल्या कोपऱ्यात निघून जाते याचा काही थांग पत्ता लागत नाही. पालीच्या मागे धावण्यात आपला मात्र घाम निघतो. पण या धावपळीचा काही फायदा मात्र होत नाही. यापेक्षा मी तुम्हाला पाल पळवण्यासाठीचे काही उपाय सांगते. काही दिवस हे उपाय ट्राय करून बघा.
१) कॉफी पावडर आणि तंबाखू पावडर मिसळून घ्या. याच्या लहान लहान गोळ्या करून पाली येतात त्या ठिकाणी ठेवा. हे मिश्रण खाल्ल्यानंतर पाणी मरतील किंवा पळून जातील.
२) पाली मोरपंखाला घाबरतात. मोरपंख बघून त्यांना जवळपास साप असल्याचा भ्रम होतो. याच कारणास्तव ते पळतात. यासाठी घराच्या प्रत्येक रूममध्ये मोरपंख ठेवले पाहिजे.
३) डांबर गोळ्या वॉर्डरोब, वॉश बेसिन आणि इतर कोपऱ्यांमध्ये ठेवाव्यात. अशा ठिकाणी पाल येत नाही. नेफ्थलीनच्या (डांबर) गोळ्या आपण टॉयलेटमध्ये वापरतो.
४) कांदा कापून लाईटजवळ लटकावा. याच्या वासामुळे पाली पळतात.
५) पाणी आणि मिरपूड मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण किचन, बाथरूम, सिंक आणि घरातील कोपऱ्यांमध्ये शिंपडा. याच्या वासामुळे पाली पळतात.
६) कांदा आणि लसणाचा वापर करून स्प्रे तयार करून कोपऱ्यात शिंपडू शकतात.
7) अंड्याचं कवच तुम्ही घरात लटकवून ठेवू शकता. त्यामुळे पाली येत नाहीत. अंड्याच्या कवच पाहून पालींना वाटतं की तिथं दुसऱ्या कुठल्या सरपटणाऱ्या प्राण्याचं अस्तित्व आहे.
८) बर्फाचं पाणी तुम्ही पालीवर स्प्रे करू शकता. त्यामुळे पाल जागेवरून हलू शकत नाही. तेव्हा तुम्ही तिला बाहेर फेकू शकता.
हेही वाचा