Advertisement

घरात धुमाकूळ घालणाऱ्या झुरळांपासून 'असा' मिळेल सुटकारा


घरात धुमाकूळ घालणाऱ्या झुरळांपासून 'असा' मिळेल सुटकारा
SHARES

पावसाळ्यात ओल्या वातावरणामुळे घरोघरी झुरळं होतात. या दिवसांमध्ये झुरळं अधिक प्रमाणात येतात. याचा त्रास सर्वांनाच होत असेल. अशा वेळी अनेक जण घरात पेस्ट कंट्रोल करतात. याचा झुरळांसोबत आपल्या शरीरावर देखील वाईट परिणाम होतो. काहींना अॅलर्जी तर काहींना श्वसनाचा त्रास होतो. पण झुरळं पळवण्यासाठी घरगुती उपाय देखील आहेत. याचा उपयोग करून तुम्ही झुरळांचा नायनाट करू शकता.

1) तेजपत्त्याच्या सुगंधानं झुरळं बाहेर पळतात. घरातील ज्या कोपऱ्यात झुरळं अधिक प्रमाणात असतात तिकडे तेजपत्त्याची पानं बारीक करून ठेवा. पानं बारीक केल्यावर हाताला तेल लागेल. या तेलाच्या वासामुळे झुरळं लांब पळतात.

2) एका वाटीत बेकिंग पावडर आणि साखर मिश्रित करा. साखरेकडे झुरळं आकर्षित होतात आणि बेकिंग सोड्यामुळे ते मारले जातात.

3) झुरळाला घरातून पळवण्यासाठी लवंग फायदेशीर आहे. ज्या ज्या जागांवर झुरळं येतात त्या ठिकाणी काही लवंग ठेवाव्यात. लवंगच्या वासामुळे झुरळं घरातून पळतात.

4) बोरिक पावडर घरातल्या काही जागांवर टाकल्यास झुरळं घरातून बाहेर पळतात.

5) केरोसिनचा वापर करूनही घरातील झुरळं घरातून बाहेर पळतात.

6) चमचाभर गव्हाच्या पीठामध्ये बोरीक पावडर मिसळून तयार मिश्रणाचा गोळा मळा. त्याचे लहान लहान गोळे बनवून घरातील कोपऱ्यात ठेवा. यामुळे झुरळांचा वावर कमी होण्यास मदत होईल.

7) कडुलिंबाची पानं वाटून त्याची पेस्ट करावी. या पेस्टमध्ये थोडं अधिक पाणी मिक्स करावे. त्यानंतर गाळण्यानं हे मिश्रण गाळून घेणे. गाळल्यानंतर जे पाणी येईल ते एका स्प्रेमध्ये टाकावे. जिथे झुरळं आहेत त्या भागात हे पाणी स्प्रे करावे.

8) एक गॅलन पाण्यात लिसरिन टाका. हे पाणी स्प्रेमध्ये भरा. संक्रमित भागात हे पाणी स्प्रे कारवे.

9) काळी मिरे, कांदे आणि लसूनची पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि एक सोल्युशन तयार करा. ते झुरळ असलेल्या जागांवर स्प्रे करा. याचा वासाने झुरळ घर सोडून पळून जातील.



हेही वाचा

कडुनिंबाच्या पानांचा 'असा'ही वापर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा