कडुनिंबाच्या पानांचा 'असा'ही वापर

चेहऱ्यावर पुळकुट्या येणं, चेहरा काळवंडणं यासारख्या समस्यांचा सामना प्रत्येकानं कधी ना कधी केलाच आहे. या समस्येतून सुटका करून घ्यायची असेल, तर अनेक जण सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. पण या प्रसाधनांचा अतिवापर केल्यामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असेत. पण आजीबाईच्या बटव्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या वापरामुळे तुम्ही या समस्यांवर मात करू शकता. त्यापैकीच एक म्हणजे कडुनिंबाचा पाला.

कडुनिंबाच्या पाल्यामध्ये अनेक उपयुक्त घटक आहेत. कडुनिंबाच्या वापरामुळे त्वचेसंदर्भातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. कडूबिंबामध्ये अँटी सेफ्टिक, अँटी बॅक्टेरिअल हे गुणधर्म आहेत. कडुनिंबाचे हेच गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे त्वचेसंदर्भातील कुठल्याही समस्येवर कडुनिंबाचा वापर करायला हवा. कडुनिंब कुठेही आणि केव्हाही उपलब्ध होतो. त्यामुळे दिलेल्या टिप्स एमलात आणणं काही कठीण नाही. 

) तरूण वयातील प्रत्येकानं एकदा तरी पिंपल्सचा सामना करावा लागला आहे. या पिंपल्समुळे चेहऱ्यावर डाग किंवा खड्डे निर्माण होतात. पण हे डाग दूर करायचे असल्यास कडुनिंबाची पानं आणि तुळशीची पाने एकत्र करून लेप तयार करावा. हा लेप गुलाब पाण्यात मिसळून याचा लेप चेहऱ्यावर लावावा. सुकल्यानंतर गार पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवावा. कडुनिंबाची पानं बारीक करून दही आणि मुल्तानी मातीमध्ये मिसळून पेस्ट करावी. यामुळे देखील चेहऱ्यावरील डाग कमी होतील

) तुमची त्वचा कोरडी असेल तर अशा त्वचेसाठी कडपनिंबाचा लेप फायदेशीर आहे. कडुनिंबाच्या पानांच्या पेस्टमध्ये थोडं मध मिसळून हा लेप १५ मिनिटं चेहऱ्यावर लावावा. त्यानंतर पाण्यानं नीट चेहरा धुवावा. यामुळे तुमच्या त्वचेतील ओलावा टिकून राहील.

) सतत उन्हामध्ये फिरल्यानं त्वचा काळवंडली जाते. त्वचेचा रंग उजळण्यासाठी कडुनिंबाच्या पानांचा वापर करावा. कडुनिंबाची काही पानं आणि गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट गुलाब पाण्यात मिसळून तो लेप चेहऱ्यावर लावावा. एका तासानंतर लेप साध्या पाण्यानं धुवून टाकावा

४) कडुनिंबाच्या पानांची पेस्ट बनवा आणि त्यामध्ये थोडीशी हळद घाला. हा लेप शरीराला लावावा. लावलेला लेप सुकल्यानंतर तो भाग पुन्हा व्यवस्थित चोळावा आणि मग आंघोळ करावी. असे केल्यानं घामोळ्याच्या समस्येपासून सुटका होईल.

५) उकळत्या पाण्यात मुठभर कडुनिंबाची पानं टाकावीत. त्यानंतर हे पाणी गाळून घ्यावे आणि एका बाटलीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवावं. यातील थोडेसे कडुनिंबाचे पाणी दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये एकत्र करावे. ज्यामुळे घामाच्या दुर्गंधीच्या समस्येतून सुटका होईल.

६) केसामधील कोंड्याच्या समस्येनं अनेक जण त्रस्त असतील. यासाठी कडूनिंबाची पानं पाण्यात टाका आणि उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या. याचा वापर कंडिशनर म्हणून करा. यामुळे तुम्हाला असलेली कोंड्याची समस्या दूर होईल.

) जर पोटात जंतू झाले असतील तर कडुनिंबाच्या पानाच्या रसात मध मिसळून चाटण घ्यावं. याशिवाय कडुनिंबाच्या पानात थोडं हिंग मिसळून चाटण घ्यावं. यामुळे देखील पोटातील जंतू नष्ट होतील

८) केसांमध्ये उवा झाल्या असतील तर कडुनिंबाचं तेल लावावं


हेही वाचा-

आरोग्यासाठी मशरूम वरदान!

पुढील बातमी
इतर बातम्या