आरोग्यासाठी मशरूम वरदान!

मशरूम शाकाहारी असून त्यापासून कमी कॅलरीज तसंच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. मशरुममध्ये अॅन्टी व्हायरल आणि अॅन्टी कॅन्सरचे विशेष गुणधर्म आढळून आले आहेत, हे संशोधनानंतरच सिद्ध झालं. मशरुम सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ नसेल, पण मशरुम खाण्याचे बरेच फायदे आहेत.

  • आरोग्यासाठी मशरूम वरदान!
  • आरोग्यासाठी मशरूम वरदान!
  • आरोग्यासाठी मशरूम वरदान!
SHARE

मशरूमला जगभर एक पौष्टिक अन्न म्हणून मान्यता मिळालेली आहे. आपल्या शरीराच्या वाढिसाठी १० अमिनो आम्लांची गरज असते. ही दहाच्या दहा अमिनो आम्ले मशरूममध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. हजारो वर्षापासून मशरुमचा खाद्यपदार्थांमध्ये वापर होतो आहे. सुमारे ४०० वर्षापूर्वी ग्रीक लोकांनी सर्वात पहिल्यांदा मशरुमचा खाण्यासाठी वापर केला.


सौजन्य

मशरूम शाकाहारी असून त्यापासून कमी कॅलरीज तसंच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. मशरुममध्ये अॅन्टी व्हायरल आणि अॅन्टी कॅन्सरचे विशेष गुणधर्म आढळून आले आहेत, हे संशोधनानंतरच सिद्ध झालं. मशरुम सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ नसेल, पण मशरुम खाण्याचे बरेच फायदे आहेत


१) मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहाइड्रेट्स असतात. त्यामुळे मशरूमच्या सेवनानं वजन कमी होते. म्हणूनच मशरूमचा डाएटमध्ये समावेश असतो

२) मशरूममुळे रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित करण्यास मदत होते. मशरूममध्ये एन्झाइम्स आणि नैसर्गिक इंसुलिन असतं. जे शरीरातील साखर आणि स्टार्च कमी करण्यास मदत करतं.


सौजन्य

३) मशरूममध्ये व्हिटामिन डी असतं. हे व्हिटामिन हाडाच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं. मशरूम खाल्ल्यानं २० टक्के व्हिटामिन डीची कमतरता भरून निघते.

४) मशरूममध्ये सेलिमियम असल्यानं शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे सर्दी, खोकला असे किरकोळ आजार लवकर होत नाहीत. याशिवाय इतर आजारांना देखील रोखते

५) यामध्ये न्यूट्रिएंट्स आणि एन्झाइम असल्यानं हृदयाच्या तक्रारी दूर होतात.


सौजन्य

६) मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि बराच वेळ भूक लागत नाही.

७) यात बीटा ग्लायसीन आणि लिनॅलिक अॅसिड असते. त्यामुले प्रोस्टेट आणि ब्रेस्ट कँसर होण्याचा धोका कमी होतो

८) मशरूमचं सेवन केल्यानं पचनक्रिया सुधारते. अपचनगॅस असे त्रास होत नाहीत


कव्हर फोटो सौजन्य


हेही वाचा-

रिकाम्या पोटी लसूण खा आणि निरोगी राहा!संबंधित विषय
ताज्या बातम्या