Advertisement

तुम्ही भेसळयुक्त पदार्थ तर नाही खात ना? अशी ओळखा भेेसळ


तुम्ही भेसळयुक्त पदार्थ तर नाही खात ना? अशी ओळखा भेेसळ
SHARES

खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होणं हे सर्वसामान्यांसाठी काही नवीन नाही. सणासुदीच्या काळात भेसळीच्या बातम्या वारंवार वाचायला मिळतात. आपल्या जेवणात रोज वापरले जाणारे मसाले, दूध, चहा पावडर, मध, तेल, पनीर यात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. अर्थात हे भेसळयुक्त पदार्थ आपल्या आरोग्यासाठी नक्कीच हानीकारक आहेत. अशा पदार्थांपासून सावध राहणं आवश्यक आहे. खाद्यपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी काही टिप्स...


१) चहा

चहा तर सर्वांच्या आवडीचं पेयं आहे. सकाळी उठलं की सर्वांना पहिला चहा हवा असतो. पण तुम्ही वापरत असलेल्या चहा पावडरमध्ये देखील अनेकदा भेसळ केली जाते. 


चहा पावडरमधील भेसळ ओळखण्यासाठी एक सोपा उपाय आहे. चहा पावडर थंड पाण्यात घातल्यानंतर रंग सोडत असेल, तर त्यात भेसळ आहे.


२) दूध

दुधातील भेसळीच्या अनेक घटना आपण बातम्यांमध्ये पाहिल्या आहेत. दुधात डिटर्जंट मिसळली जाते किंवा सिंथेटिक दूधही विकलं जातं. असं भेसळयुक्त दूध पिणं जिवघेणं असून शकतं. यासाठी १० मिली. दूध तितक्याच पाण्यात एकत्र करा. त्यात फेस झाल्यास ती डिटर्जेंटची भेसळ आहे. तर सिंथेटिक दुधाची चव चांगली नसते आणि ते उकळवताना त्याला फिक्कट पिवळा रंग येतो.


३) पनीर

पनीर खायला कुणाला नाही आवडत. शाकाहारी असो वा मांसाहारी प्रत्येकजण आवडीनं पनीर खातो. पण पनीरमध्ये स्टार्च मिसळून आपल्याला उल्लू बनवण्यात येऊ शकतं. अशा वेळी थोड्याशा पाण्यात पनीर घालून उकळून घ्यावं. पनीर थंड झाल्यावर त्यावर आयोडिन सोल्युशनचे काही थेंब टाकून त्याचा रंग तपासा. पनीरचा रंग निळा झाला तर त्यात भेसळ आहे हे ओळखावं.


४) लाल तिखट

रोजच्या जेवणात लाल तिखट वापरलं जातंच. लाल तिखटात विटेचा चुरा किंवा मीठ मिसळलं जातं. ही भेसळ ओळखणं अगदीच सोपं आहे. एक चमचाभर लाल तिखट ग्लासभर पाण्यात एकत्र करा.


त्यात जर आर्टिफिशल रंगाची लेअर तयार झाली, तर त्यात भेसळ आहे. याशिवाय जर तळाशी लाल रंग जमा झाला तर समजा की यात विटेचा चुरा टाकला आहे.


५) हळदहळदीमध्ये पाच थेंब हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि पाच थेंब पाणी घालावं. त्यानंतर ते मिश्रण हलवावं. जर पाण्याचा रंग गुलाबी दिसला तर त्यात पिवळा कृत्रिम रंग आहे. जर बुडबुडे दिसले तर त्यात खडूची पावडर आहे.


६) हळकूंड


हळद भेसळयुक्त असते म्हणून काही जणं घरीच हळकुंडापासून हळद बनवतात. पण हळदकुंडात भेसळ ओळखायची असेल तर एका कागदावर हळदकूंड ओळखून त्यावर थोडं थंड पाणी ओतावं. हळदकुंडाचा रंग गेल्यास ते पॉलिश केलेलं आहे हे कळू शकेल.


७) दालचिनीदालचिनीची सत्यता पडताळणं कठिण नाही. दालचिनी हातावर रगडल्यानंतर जर तुमच्या हाताला रंग लागला तर ती अस्सल दालचिनी आहे.


८) खोबरेल तेलखोबरेल तेलात बऱ्याचदा इतर तेल मिसळलं जातं. ही भेसळ ओळखम्यासाठी खोबरेल तेलाची छोटी डबी फ्रीजमध्ये ठेवावी. तेल गोठलं तर त्यात भेसळ नाही असं ओळखावं.


९) धने पावडर


धने पावडामध्ये लाकडाच्या भुश्याची भेसळ केली जाते. त्यामुळे धने पावडर थोड्याश्या पाण्यात टाकावे. जर धने पावडरमध्ये भुसा असेल तर तो पाण्यावर तंरगेल.


१०) काळी मिरीकाळी मिरीत भेसळ असेल तर ते खूप चमकेल. त्याला हलकासा रॉकेलसारखा वास देखील येईल.


११) सफरचंद

नीट निरिक्षण केलंत, तर हल्ली सफरचदांला एक प्रकारची चकाकी आलेली आढळते. मेणामुळे सफरचंदाला एक चकाक येते. तुम्हाला जर तपासून बघायचे असेल, तर फळाच्या सालावरून ब्लेड किंवा सुरी फिरवा. पांढऱ्या रंगाचा काही पदार्थ ब्लेड किंवा सुरीला चिकटला तर ते मेण असेल हे समजून जा. असं झाल्यास सफरचंद सालं काढून खा.हेही वाचा-

हे १० उपाय करा, तुमचीही लाईफ होईल जिंगा लाला!संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा