Advertisement

हे १० उपाय करा, तुमचीही लाईफ होईल जिंगा लाला!


हे १० उपाय करा, तुमचीही लाईफ होईल जिंगा लाला!
SHARES

आयुष्यात आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक म्हणजे आरोग्याशी संबंधित समस्या. कधी पाय दुखणे, अंग दुखणे, छातीत दुखणे, मळमळ होणे, घसा खवखवणे अशा अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत आपण त्वरीत डॉक्टरांकडे जातो. पण डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच घरगुती उपाय देखील तुम्ही करू शकता. अनेकदा आपण एवढे व्यस्त असतो की डॉक्टरकडे जायला वेळच मिळत नाही. जर दुखणं छोटं-मोठं असेल तर अशा वेळी तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता. यासाठी फक्त १० ते १५ मिनिटं लागतील. पण जर कुठली गंभीर समस्या असेल, तर मात्र डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे.


) दिवसभर चालून किंवा रेल्वेमध्ये उभं राहून आपले पाय दुखायला लागतात. अशा वेळी एका बादलीत पाणी घेऊन त्यात ३ चमचे बेकिंग सोडा टाकावा. त्यानंतर त्यात पाय टाकून १० ते १५ मिनिटं बसावं. यामुळे तुमचे पाय स्वच्छ तर होतीलच, शिवाय ते दुखणारही नाहीत.



) तुमच्या पायाला फोड आले असतील तर उबदार पाण्यामध्ये एक चतुर्थांश कप लिस्टरीन टाकावे. त्यात पाय बुडवून ठेवावा. यामुळे तुमचे पाय पूर्ववत होतील.



) टी-बॅगचा वापर करून झाला की ते आपण टाकून देतो. पण टी बॅग टाकून न देता त्याचा वापर करावा. उन्हाळ्यामध्ये अंगावर डाग पडतात. अशा वेळी उकळत्या पाण्यामध्ये ३ टी बॅग टाकाव्यात. उकळल्यानंतर त्यामध्ये थोडा बर्फ टाकून ते टॉवेलमध्ये टाकून डागांवर चोळावे.



) घसा खवखवत असेल, तर थोडे सफरचंदाचे व्हिनेगर थोड्याशा पाण्यामध्ये टाकून गुळण्या करात्यामुळे घशाची खवखव थांबेल.



) पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाकून ते पाणी प्या. त्यामुळे छातीतील जळजळ आणि अॅसिडिटी कमी होईल.



) जखम झाली असल्यास त्यावर मध लावावे आणि त्यावर पट्टी लावावी. यामुळे जखम लवकर बरी होईल.



) मधमाशी चावली असल्यास त्यावर मध लावावे. जळजळ कमी होऊन आराम मिळेल.



) एक कप आल्याच्या चहामध्ये थोडेसे मध आणि लिंबाचा रस घाला आणि तो चहा प्या. यामुळे तुमच्या पोटातील मळमळ थांबेल.



) तुम्ही लसूण खात असाल, तर ठेचलेला लसूण पाण्यात टाका आणि त्याच्या गुळण्या करा. असे केल्यास घसा साफ होतो.



१०) तुम्हाला झोपेची समस्या आहे. मग चेरी खाल्यानं ही समस्या दूर होऊ शकते. कारण चेरीमध्ये मेलाटोनिन असतेत्यामुळे झोप न येण्याची समस्या मार्गी लागेल.



हेही वाचा

जेवणातच नाही तर 'या' कारणांसाठी देखील तमालपत्र फायदेशीर

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा