Advertisement

मध खाण्याआधी 'हे' नक्की वाचा!


मध खाण्याआधी 'हे' नक्की वाचा!
SHARES

मधाला आयुर्वेदात अमृतासमान मानले आहे. मधामध्ये नैसर्गिक गोडवा, औषधी गुणधर्म असण्याबरोबरच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात देखील मधाचा वापर आपण करतो. कोमट पाण्यात मध टाकून रोज सकाळी त्याचं अनेकजण सेवन करतात. तर कुणी दुधात, सलाडमध्ये किंवा हेल्दी स्मूथीमध्ये मध मिसळून खातात. पण जर मधात भेसळ असेल, तर आरोग्यदायी मध विषासमान आहे. त्यामुळे मध विकत घेताना त्यात भेसळ आहे की नाही? हे ओळखणं फार कठीण आहे. तुमच्या डोळ्यांदेखत मधमाशीच्या पोळ्यातून मध काढलं तर ठीक आहे. पण तुम्ही बाटलीबंद मध वापरत असाल, तर एकदा त्याची पडताळणी केलेलीच बरी! आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे मधात भेसळ आहे की नाही? हे ओळखणं सोपं होईल.



) माचिसची काडी मधामध्ये डिप करून ती माचिसच्या डबीवर घासा. मध शुद्ध असेल तर काडी जळेल.

) एक थेंब मध आपल्या अंगठा आणि मधल्या बोटावर घेऊन घासा. शुद्ध मधाला त्वचा शोषून घेते. त्यामुळे बोट चिकट लागत नाही.

) काचेचा ग्लास किंवा बाऊलमध्ये पाणी घ्या. मधाचे काही थेंब टाका. जर ते पाण्यात जमा झाले तर ते शुद्ध मध आहे.

) थोडेसे मध कुत्र्याला खायला द्या. कुत्रे कधीच मध खात नाही. जर त्यानं मध खाल्ले तर मध भेसळयुक्त आहे.



) ब्रेडवर लावलेल्या मधात भेसळ नसेल तर ते लगेच कडक होईल. पण जर भेसळ असेल तर मधातला ओलावा तसाच राहील.

) टिश्यू पेपर, पेपर टॉवेल किंवा कपड्यावर थोडेसे मध टाका. जर हे शोषले जात नसेल तर ते शुद्ध आहे.

) एका वाटीत मध टाकून त्यामध्ये बत्तासा टाका. जर मध शुद्ध असेल तर बतासा विरघळणार नाही.

) शुद्ध मध उन्हाळ्यात विरघळते, तर हिवाळ्यात घट्ट होते.

मधाचा जार हलवून पाहा. मध शुद्ध असेल तर ते सहज हलणार नाही.



हेही वाचा

आंब्याचे 'हे' भन्नाट पदार्थ नक्की ट्राय करा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा