Advertisement

'हे' वाचून केळ्याचं साल तुम्ही टाकणार नाहीत ही गॅरंटी!

केळीचे आरोग्यासाठीचे अनेक फायदे आहेत हे सर्वांनाच माहीत आहेत. पण केळीच्या सालाचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? केळं खाऊन झालं की आपण केळीचं साल फेकून देतो. पण या केळीच्या सालाचे अनेक फायदे आहेत. हे फायदे ऐकून तुम्ही केळीचं साल कधीच फेकणार नाहीत ही गॅरंटी!

'हे' वाचून केळ्याचं साल तुम्ही टाकणार नाहीत ही गॅरंटी!
SHARES

केळीचे आरोग्यासाठीचे अनेक फायदे आहेत हे सर्वांनाच माहीत आहेत. पण केळीच्या सालाचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? केळं खाऊन झालं की आपण केळीचं साल फेकून देतो. पण या केळीच्या सालाचे अनेक फायदे आहेत. हे फायदे ऐकून तुम्ही केळीचं साल कधीच फेकणार नाहीत ही गॅरंटी!



  • केळीचं साल खाणं जरा विचित्र आहे. पण केळीचं साल तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे. तुम्ही केळीचं साल कच्चं किंवा शिजवून खाऊ शकता. यामुळे तुमचं वजन कमी होऊ शकतं. केळ्याच्या सालीत सॉल्यूबल आणि इन्सॉल्यूबल असं दोन प्रकारचं फायबर आहे.
  • जर तुम्हाला झोप येत नसेल, तर केळीचं साल खावं. केळीच्या सालीत ट्रिप्टोफेन नावाचे एक केमिकल असते. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते.
  • तुम्हाला दृष्टिदोषाचा त्रास असेल, तर केळीचं साल खा. केळीच्या सालीत ल्यूटीन असते. जे नजर तीक्ष्ण करण्यास मदत करते.



  • टूथपेस्ट संपली असेल किंवा दात पिवळे दिसत असतील, तर केळीचे साल दातांवर घासा. तुम्हाला एका आठवड्यात फरक जाणवेल. पण हो, याचा अर्थ तुम्ही ब्रश करू नका असा होत नाही!
  • चेहऱ्यावर मुरुमं किंवा फोडी आल्या असतील, तर केळ्याची साल चोळावी. बाजारात येणाऱ्या कुठल्या तरी क्रिम्स लावण्यापेक्षा केळीच्या सालांचा पर्याय योग्य आहे. केळीच्या सालीत अँटीऑक्सिडंट्स असल्यानं तुमचा चेहरा स्वच्छ आणि तजेलदार होईल.
  • केळीच्या सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर घासा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्यानं धुवा. हे नियमित केल्यानं त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.



  • केळीच्या सालीमधले पांढरे धागे काढून त्यात अॅलोव्हेरा जेल मिसळा आणि हे डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांवर लावा. याने डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी होतील.
  • हातापायावर छोटी जखम झाली असल्यास त्यावर केळीची साल लावा. सालीमधील गुणधर्म जखम बरी करण्यास हातभार लावतात.
  • उन्हाळ्यात अनेकवेळा पुरळचा त्रास होतो. त्यावर केळीचं साल म्हणजे रामबाण उपाय आहे. तात्काळ नाही पण काही दिवसांमध्ये पुरळ नाहिसे होतील.
  • केळीच्या सालीचा वापर नैराश्यातून बाहेर येण्यासाठी फायदेशीर आहे. केळीचं साल पाण्यात उकळून ते पाणी प्यायलात तर तुम्ही तणावातून मुक्त व्हाल. अँटीडिप्रेसमेंट हे मेडिसन नैराश्याच्या आजारात घेतलं जातं. या औषधात असणारे गुणधर्म केळीच्या सालीत आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील सेरोटोनिनच्या हॉर्मोनची मात्रा वाढते.



  • चामखिळीपासून सुटका करायची असेल, तर त्या ठिकाणी केळ्याची साल लावून ठेवा. केळीचे साल टेपने चिकटवा. तुम्हाला एका आठवड्यात परिणाम दिसून येईल.
  • केळ्याच्या सालीचा वापर लेदरचे शूज आणि चांदीचे दागिने पॉलिश करण्यासाठी केला जातो. यामुळे शूज आणि दागिने दोन्ही मस्त चकाचक होतील.
  • तुमच्या बागेतील झाडांच्या पानांवर डाग पडले असतील किंवा पानं खराब झाली असतील तर केळीचं साल पानांवर घासावे. त्यामुळे झाडांची पानं पुन्हा टवटवीत होतील.



हेही वचा

...म्हणून उन्हाळ्यात कोकम सेवन केलेच पाहिजे!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा