Advertisement

दररोज एक केळे खा आणि शरीरस्वास्थ जपा


दररोज एक केळे खा आणि शरीरस्वास्थ जपा
SHARES

दिवसाला एक सफरचंद तुम्हाला डॉक्टरांपासून दूर ठेवेल असं आपल्याला नेहमीच सांगितलं जातं. पण, दररोज एक केळे खाल्ल्यानेही तुमचं शरीरस्वास्थ चांगलं राहू शकतं, असं आम्ही नाही तर आहरतज्ज्ञ आणि डॉक्टर सांगतात. केळ्यामध्ये आरोग्याला आवश्यक असणारे घटक असतात


केळे खाल्ल्याचे फायदे

  • सध्या ह्रदयविकाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे दिवसभरात एक केळे तुम्हाला ह्रदयविकाराच्या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करू शकते. हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी केळे मदत करते.
  • केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि बी ६ असतात. दररोज केळे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतं.
  • स्मरणशक्ती सुधारते - केळ्यामध्ये व्हिटामिन बी ६ पुरेशा प्रमाणात आढळतं. ज्यामुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. त्यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
  • अशक्तपणा होईल दूर - केळी खाल्ल्याने इन्स्टंट एनर्जी मिळते. दररोज केळी खाल्ल्यास अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. शिवाय, भुक लागल्यानंतर केळे खाल्ल्यास भूक कंट्रोल होण्यासही मदत होते.
  • पचनशक्ती सुधारेल - केळ्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतात. केळी खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. तसेच बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीचा त्रास होत नाही.
  • ब्लडप्रेशर कंट्रोल होतं - केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतात. केळे खाल्ल्याने शरीरात सोडियमचं प्रमाण संतुलित राहतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राखण्यास मदत होते.
  • युरिनरी इन्फेक्शनपासून बचाव - केळ्यामधील मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे युरिनरी इन्फेक्शनपासून बचाव होतो.
  • दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळे खाणे फायदेशीर ठरते.


परीक्षा देणाऱ्या मुलांनी तर जरूर केळे खा.

  • केळे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात
  • केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. 
  • रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम केळे करते
  • केळे हे मधुर, शीत आणि कफकारक आहे

केळे हे शरीरातील कॅल्शिअम, नायट्रोजन आणि फॉस्फरस यांचं प्रमाण टिकवून ठेवते. त्यामुळे स्नायू, मांसपेशी बळकट होऊन शरीर कार्यक्षम बनवते. म्हणून केळे हे आरोग्यवर्धक, बलदायक फळही आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा