Advertisement

म्हणून उन्हाळ्यात कोकम सेवन केलेच पाहिजे!

मिल्कशेक, फ्रीकशेक फक्त तहान भागवतात. पण कोकम सरबत तुमची तहान तर भागवतच. शिवाय कोकम सरबताच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. आयुर्वेदानुसार कोकम ही अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. आयुर्वेदात याला 'वृक्षाम्ला' आणि 'फलाम्ला' अशी नावं आहे.

म्हणून उन्हाळ्यात कोकम सेवन केलेच पाहिजे!
SHARES

उन्हाळा सुरू झाला की, आजी नेहमी सांगायची 'अरे कोकम सरबत पी. उन्हाळ्यात चांगलं असतं'. जेवणात देखील आमच्या कोकम असायचं. भाजी, आमटीत असलेलं कोकम आजी खायला लावायची. आता उन्हाळ्यात काय म्हणे तर मिल्कशेक आणि फ्रीकशेक असे काही तरी प्रकार आलेत. पण कोकम सरबतची बातच काही और!... जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पेयांशी कोकम सरबताशी तुलनाच होऊ शकत नाही. 

मिल्कशेक, फ्रीकशेक फक्त तहान भागवतात. पण कोकम सरबत तुमची तहान तर भागवतच. शिवाय कोकम सरबताच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. आयुर्वेदानुसार कोकम ही अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. आयुर्वेदात याला 'वृक्षाम्ला' आणि 'फलाम्ला' अशी नावं आहे. हेच फायदे आपण जाणून घेणार आहोत.



1) कोकममध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटामीन सी ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आहेत.

2) हयड्रोसेंट्रिक अॅसिड नावाचा आरोग्यदायी घटक देखील यात आहे.

3) मॅगनिज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम अशी खनिजद्रव्ये कोकममध्ये आहेत.

4) मधुमेहींसाठी कोकम फायदेशीर आहे. शरीरात इन्सूलिन्सची निर्मिती करून मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होईल.

५) कोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारते.



६) कोकममध्ये अँटिफंगल आणि अँटिऑक्सिडंट हे दोन गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

७) शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा गुणधर्म कोकममध्ये आहे.

८) कोकम सरबत म्हणजे कार्डिओ टॉनिक आहे. यामुळे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते.



९) कोकममध्ये असणारा हायड्रो क्रिटिक अॅसिड हा घटक शरीरातील प्रतिकारक्षमता वाढवून वजन कमी करण्यास मदत करतो.

१०) आहारामध्ये कोकमचा नियमित वापर केल्यास पोट साफ होण्यास मदत होते.

११) कोकम पाण्यात भिजवून ठेवावे. त्यानंतर भिजवलेले कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे. त्यात जिरेपूड आणि साखर घालावी. हे पाणी प्यायल्यानं शरीरावरील शीतपित्त दूर होईल.



हेही वाचा

...म्हणून हा आहे 'फळांचा राजा'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा