अशी घ्या उन्हाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी

उन्हाळ्यात त्वचेची आणि केसांची फार काळजी घ्यावी लागते. कारण धूळ, माती आणि घामामुळे केसांमध्ये चिकटपणा येतो. चेहरा देखील चिकट आणि काळवंडल्यासारखा होतो. पण आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

 • अशी घ्या उन्हाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी
 • अशी घ्या उन्हाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी
SHARE

न्हाळ्यात ऊन वाढतं तसं त्याचा परिणाम शरीरावरही होतो. विशेषत: त्वचेवर आणि केसांवर याचा फार वाईट परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची आणि केसांची फार काळजी घ्यावी लागते. कारण धूळ, माती आणि घामामुळे केसांमध्ये चिकटपणा येतो. चेहरा देखील चिकट आणि काळवंडल्यासारखा होतो. पण आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.केसांसाठी काय कराल?

 • केसांना धूळ-माती आणि उन्हापासून वाचवण्यासाठी घराबाहेर जाताना स्कार्फचा वापर करावा.
 • आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा केस धुणं गरजेचं आहे. तुमचे केस तेलकट असतील तर तुम्ही रोज केस धुतले तरी चालतील.
 • केसांच्या मुळांना लिंबाचा रस लावून २० मिनिटांपर्यंत ठेवावे. मग गार पाण्याने केस धुवावेत. यामुळे केसांमधील कोंडा निघून जाईल.
 • गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्या पाण्यानं केस धुवावेत. कोरड्या केसांमध्ये चमक येऊन ते मऊ होतील.
 • केसांना आवळ्याचा रस लावल्यानं केस चांगले राहतात.
 • केसांवर सारखा कंगवा फिरवावा. त्यामुळे केसांमधील धूळ, माती निघून जाईल.
 • केसांना हर्बल ऑइलनं मसाज करणं उत्तम
 • मेंदीत लिंबाचा रस आणि एक अंडं फेटून पॅक तयार करून केसांना लावा. त्यामुळे केसांची चमक तर वाढतेच आणि गरमीत आरामही मिळतो.
 • बेसण, लिंबाचा रस आणि दही हे सम मात्रेत घेऊन केसांवर मसाज करून केस धुतले पाहिजेत.त्वचेसाठी काय कराल?

 • उन्हाळ्यात चेहरा ताजातवाना ठेवण्यासाठी दोन चमचे बेसन, हळद, गुलाब पाणी आणि मध घालून लेप तयार करा. हा लेप चेहरा, हात-पाय आणि मानेवर लावा आणि १० मिनिटांनी धुऊन टाका.
 • डोळ्यांची आग होत असेल किंवा डार्क सर्कल कमी करण्यासाठी रात्री झोपताना डोळ्यांवर थंड दुधाच्या पट्ट्या ठेवाव्यात.
 • ओठांना सुंदर आणि मऊ बनवण्यासाठी रात्री झोपताना दुधाची साय लावा आणि सकाळी थंड पाण्याने धुवून टाका.
 • दुधात हळद घालून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहरा आणि हाता-पायावर लावावी. १० मिनिटांनी धुऊन टाकावी.
 • आठ-दहा दिवसांनी एकदा चेहऱ्यावर वाफ जरूर घ्यावी. या पाण्यात पुदिनाची पानं, तुळशीची पानं, लिंबाचा रस आणि मीठ घालावे.
 • उन्हापासून वाचण्यासाठी आणि त्वचेवरचा रूक्षपणा कमी करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरू शकते. त्वचेवर कोरफड जेलसुद्धा लावता येऊ शकते.
 • उन्हाळ्यात मुलतानी माती त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. जर तुमच्या अंगावर घामोळ्या झाल्या असतील, तर मुलतानी मातीचा लेप लावावा.हेही वाचा

होऊन जाऊदे, ठंडा ठंडा कुल कुल!


संबंधित विषय
ताज्या बातम्या