Advertisement

उन्हाळ्यात पित्ताचा त्रास होतोय? मग हे घरगुती उपाय करा...

पित्ताचा त्रास हमखास उन्हाळ्यात सहन करावा लागतो. पित्ताच्या त्रासामुळेच मग उलट्या, चक्कर येणे असे आजार होतात. पण यावर तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता. आणि अगदी सहज-सोपे हे उपाय आहेत. पित्तावर नेमकी कशी मात करावी? यासाठीचे हे काही घरगुती उपाय...

उन्हाळ्यात पित्ताचा त्रास होतोय? मग हे घरगुती उपाय करा...
SHARES

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. अशा वातावरणात फिरून अनेक आजार उद्भवतात. अपचन, पित्त, उलट्या होणं, डिहायड्रेशन, भोवळ येणं असे आजार अधिक बळावतात. यात पित्ताचा त्रास हमखास उन्हाळ्यात सहन करावा लागतो. पित्ताच्या त्रासामुळेच मग उलट्या, चक्कर येणे असे आजार होतात. पण यावर तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता. आणि अगदी सहज-सोपे हे उपाय आहेत. पित्तावर नेमकी कशी मात करावी? यासाठीचे हे काही घरगुती उपाय...



  • पित्तावर रामबाण उपाय म्हणजे केळं. केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो. त्यामुळे पोटात आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच केळ्यामध्ये फायबर असल्यानं शरीराची पचनक्रिया सुधारते.
  • तुळशीमधील अॅन्टी अल्सर घटक पोटातील अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करतात. पित्ताचा त्रास असल्यास ५ ते ६ तुळशीची पाने चाऊन खा.
  • थंड दुधाचं सेवन केल्याने पित्तामुळे होणारी पोटातील आणि छातीतील जळजळ कमी होते. दुधात कॅल्शियमचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबते आणि अतिरिक्त आम्ल दूध शोषून घेते. तसेच थंड दुधाचे सेवन करताना त्यात साखर न टाकता तूप घातल्यास ते फायदेशीर ठरेल.
  • बडिशेपमधील अॅन्टी अल्सर घटक पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठता दूर करतात. बडिशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. त्यामुळे बडिशेपचे काही दाणे चघळल्यानं पित्ताची लक्षणं कमी होण्यास मदत होते. याशिवाय बडिशेपचे दाणे पाण्यात उकळवून ते रात्रभर थंड करून सकाळी प्यायल्याने आराम मिळतो.
  • लवंग चवीला तिखट असते. तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते. पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते. पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली ठेवावी. लवंगीतून येणारा रस काहीवेळ तोंडात तसाच ठेवावा. यामुळे पित्ताची तीव्रता कमी होते.



हेही वाचा : रोज थोडं जिऱ्याचं सेवन करा, पोटाचे आजार पळवा!



  • वेलची शरीरातील वात, कफ आणि पित्त यावर नियंत्रण ठेवते. वेलचीच्या सेवनानं पचनक्रिया सुधारते आणि पित्ताचा त्रास कमी होतो. वेलचीचे दोन दाणे सालीसकट किंवा सालीशिवाय ठेचून ती पाण्यात टाकून उकळा. हे पाणी थंड करून प्या.
  • आल्याच्या सेवनाने पचन सुधारते. आल्यातील तिखट पाचक रसांमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक तुकडा चघळत राहा. आलं तिखट लागत असेल, तर पाण्यात टाकून उकळून पाणी प्या. याशिवाय आल्याच्या तुकड्यावर गूळ टाकून चघळत राहा.
  • आवळा हा पित्तनाशक आहे. त्यातील व्हिटामिन सी पोट साफ ठेवण्यास मदत करते. रोज चमचाभर आवळ्याची पावडर किंवा चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. कच्चा आवळा देखील तुम्ही खाऊ शकता.
  • पित्ताचा त्रास कमी करण्याचा एक हमखास उपाय म्हणजे शहाळ्याचे पाणी. शहाळ्याच्या पाण्यानं पचनाचा मार्ग सुधारतो.



हेही वाचा

उन्हाळ्यातल्या विकारांपासून दूर राहाण्यासाठी 'सब्जा' घ्याच!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा