Advertisement

रोज थोडं जिऱ्याचं सेवन करा, पोटाचे आजार पळवा


रोज थोडं जिऱ्याचं सेवन करा, पोटाचे आजार पळवा
SHARES

जिरे जेवणाची चव वाढवतात हे आपण सर्वांनाच माहीत आहे. जेवणाची चव वाढवण्याबरोबरच जिरे आपल्या आरोग्यासाठीही तितकेच फायशीर आहे. जिऱ्याचं नुसतं सेवन करूनही अनेक आजारांना पळऊ शकतो. विशेष म्हणजे पोटाच्या आजारासाठी जिरे हे औषधासारखं काम करतं.


जिऱ्याचं पाणी चहा म्हणून सकाळी घ्या 

खरंतर, जिरं हे प्रामुख्याने वजन कमी करण्यासाठी खाल्ल जातं. रोज एका ग्लासभर पाण्यात जिरं रात्रभर भिजवून ठेवलं आणि ते पाणी सकाळी चहा म्हणून प्यायलात तर तुमच्या पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते.


जिऱ्याच्या या मिश्रणाचाही फायदा 

जिरेपूड खल्ल्यानंतर एक तास काहीही खाऊ नका. भाजलेलं हिंग, जिरे, काळे मिठ यांचं पावडर करून १-३ ग्रॅम समान प्रमाणात करा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा दह्यासोबत घ्या. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होईल. जिरे शरीरातील रक्ताभिसरण चांगलं करतं शिवाय कोलेस्ट्रॉल कमी करायलाही मदत करते.


जिरे आणि गुळाचं पाणी ठेवेल डोकेदुखी दूर

जर सतत डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल तर गूळ आणि जिऱ्याचं पाणी रोज घेतल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. डोकेदुखीशिवाय, ताप असेल तर जिरे आणि गुळाचं पाणी प्यायल्याने फायदा होतो.


रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत

जिरं हे औषधी आहे. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यास मदत होते. यामुळे, रोगप्रतिकारक क्षमता वाढते. जिरे आणि गुळाचे पाणी पोटाच्या प्रत्येक समस्या दूर करू शकतात. बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे आणि पोटदुखी यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी दररोज जिरे आणि गुळाचं पाणी प्या.

पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास असेल तरीही हे पाणी घेतलं तर फरक जाणवेल. शिवाय, महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोन्स बदलामुळे त्रास होतो. यावरही गुळ आणि जिऱ्याचे पाणी किंवा नुसतं जिरंही फायदेशीर ठरतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा