Advertisement

उष्णतेमुळे पोटाच्या विकारांमध्ये वाढ, स्ट्रीट कोल्ड्रिंक्समुळे सर्वाधिक धोका

उन्हाळ्यामध्ये पोटाचे विकार होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता. आपल्या पाणी पिण्याच्या सवयी महत्त्वाच्या ठरतात. पिण्याचे पाणी न मिळाल्यामुळे बाजारात असलेले पर्याय म्हणजेच लिंबू पाणी, ताक, फळांचे ज्यूस, कोल्ड्रिंक आणि इतर ड्रिंक्स घेतली जातात. हेच पोटदुखीचे मुख्य कारण समोर येत आहे.

उष्णतेमुळे पोटाच्या विकारांमध्ये वाढ, स्ट्रीट कोल्ड्रिंक्समुळे सर्वाधिक धोका
SHARES

उन्हाळा म्हणजे उकाडा, घाम, चिकचिकाट आणि त्यासोबत येणारे वेगवेगळे आजार. गेल्या महिन्यापासून तापमानात झालेल्या वाढीमुळे नवी मुंबईत पोटाच्या विकारांमध्ये वाढ झाल्याचं वाशीच्या स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलच्या एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. गेल्या २० दिवसांत केलेल्या या सर्वेक्षणामध्ये ही बाब समोर आली आहे.


स्टमक फ्लूचाही धोका वाढला

गेल्या १० दिवसांत पोटदुखी आणि किडनीच्या आजारांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रस्त करणारा आजार म्हणजे गॅस्ट्रोएन्ट्रायटिस यालाच ‘स्टमक फ्लू’ असंही म्हणतात.



रस्त्यावरचे लिंबूपाणी, ज्यूस पिऊ नका!

याविषयी अधिक माहिती देताना स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख डॉ. मेहुल कालावाडिया यांनी सांगितलं की, "उन्हाळ्यामध्ये पोटाचे विकार होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता. आपल्या पाणी पिण्याच्या सवयी महत्त्वाच्या ठरतात. पिण्याचे पाणी न मिळाल्यामुळे बाजारात असलेले पर्याय म्हणजेच लिंबू पाणी, ताक, फळांचे ज्यूस, कोल्ड्रिंक आणि इतर ड्रिंक्स घेतली जातात. हेच पोटदुखीचे मुख्य कारण समोर येत आहे.



हलक्या दर्जाचा बर्फ हानीकारक

दूषित पाण्यात असलेल्या नोरोव्हायरस, रोटाव्हायरस आणि एस्ट्रोव्हायरस यांसारख्या जीवाणूंमुळे गॅस्ट्रोएन्ट्रायटिस हा आजार पसरतो. उन्हाळ्यात हातगाडीवर मिळणारे बर्फाचे गोळे, सरबत, फळांचे रस, हलक्या दर्जाची आईस्क्रिम्स सर्वत्र उपलब्ध असतात. यात अनेकदा जो बर्फ वापरला असतो, तो आरोग्यखात्याने प्रमाणित केलेला नसतो. बहुसंख्य ठिकाणी तो अशुद्ध पाण्यापासून बनवलेला असतो. अशा बर्फाच्या वापरामुळे या पदार्थातून टायफॉईड, कावीळ अशासारखे गंभीर आजार पसरण्याचा धोका आहे. पाईल्स, फिशर आणि बद्धकोष्टता यांसारखे आजारदेखील मार्च ते मे महिन्यात वाढीस लागतात.


स्त्रियांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन

उन्हाळ्यामध्ये पोटदुखीसोबतच ताप येणं आणि त्यासोबत युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याच्या समस्यांमध्येसुद्धा वाढ होते. उन्हाळ्यामुळे डिहायड्रेशन झाल्यास जीवाणू मूत्राशयामध्ये प्रवेश करतात. हा आजार स्त्रियांमध्ये अधिक दिसतो. यामध्ये तीव्र ताप, थंडी, ब्लॅडरच्या आजूबाजूला वेदना, वारंवार लघवी होणं आणि त्याभागात जळजळ होणं अशी लक्षणे दिसतात.



स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी

जिवाणूंचं जास्त संक्रमण झाल्यास झोप लागत नाही. कामावर जाणाऱ्या अथवा फिरतीची कामे करणाऱ्या महिलांनी शारीरिक स्वछतेकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या आजारांच्या पार्श्वभूमीवर स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलने आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मोफत व्याख्यानमाला, चर्चासत्र आणि आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित केली आहेत. यात पोटांचे विविध आजार आणि इतर विकारांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.



हेही वाचा

उन्हाळ्यातल्या विकारांपासून दूर राहाण्यासाठी 'सब्जा' घ्याच!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा