Advertisement

उभं राहून पाणी पिऊ नका! हे होतील दुष्परिणाम!

खरंतर पाणी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याचं सेवन ही योग्य पद्धतीने आणि वेळेवर होणं गरजेचं आहे.

उभं राहून पाणी पिऊ नका! हे होतील दुष्परिणाम!
SHARES

शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करावं असा सल्ला दिला जातो. पण, हेच पाणी जर तुम्ही उभं राहून पित असाल, तर त्याचे दुष्परिणामही होतात. त्यामुळे 'पाणी पित असताना ते एका जागी बसूनच प्यावं' असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

खरंतर पाणी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याचं सेवन ही योग्य पद्धतीने आणि वेळेवर होणं गरजेचं आहे. याविषयी, जनरल फिजिशियन डॉ. जयेश लेले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उभ्याने पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होऊ शकतात? याची माहिती दिली...

आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात अनेकजण उभ्यानेच पाणी पितात. मग ते ऑफीस असो, घर असो किंवा प्रवास.


पाणी श्वासनलिकेत जाणे

जर तुम्ही पाणी उभं राहून आणि घाईघाईने पित असाल, तर पाणी अन्ननलिकेत न जाता श्वासनलिकेत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ठसका लागू शकतो. त्यामुळे बसून पाणी पिणं कधीही चांगलं.



किडनीचे विकार

किडनीचं काम आहे पाण्याला फिल्टर करणं. पण, उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी किडनीतून योग्य पद्धतीने फिल्टर न होता वाहून जाते. हळूहळू मूत्राशय आणि रक्तात घाण जमा होऊ लागते. जर हीच स्थिती कायम राहिली तर मूत्राशय, ह्रदय आणि किडनीचे विकार होऊ शकतात.


पोटाचे आजार

उभं राहून पाणी प्यायल्यामुळे पाणी अन्ननलिकेद्वारे वेगाने पोटात जाते. उभ्याने पाणी प्यायल्यास पाणी थेट अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब टाकते. त्यामुळे पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात. सतत असं झाल्याने पचनतंत्र बिघडू शकते. यामुळे ह्रदयालाही धोका पोहोचू शकतो.



तहान भागत नाही

उभं राहून पाणी प्यायल्याने तहान कधीच पूर्णपणे भागत नाही. तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते. याउलट निवांत एक जागी बसून पाणी प्यायल्यास तहान पूर्णपणे भागते.


संधिवाताचा त्रास

जर तुम्ही उभं राहून पाणी पित असाल तर भविष्यात संधिवाताचा त्रास उद्भवू शकतो. कारण, उभं राहून पाणी प्यायल्याने शरीरातील द्रव पदार्थांचं संतुलन बिघडतं. पाणी सरळ तीव्र वेगाने खालच्या दिशेने जाते जे सांध्यामध्ये असलेल्या द्रव पदार्थांचे संतुलन बिघडवून तिथे गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. ज्यामुळे सांधेदुखी आणि गाठ येण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.



नसांमध्ये तणाव

जेव्हा तुम्ही उभं राहून पाणी पिता, तेव्हा शरीराची फाईट सिस्टीम अॅक्टिव्हेट होते. त्यामुळे सर्व नसांवर ताण पडतो. या विरुद्ध जर बसून पाण्याचं सेवन केल्यास पॅरासिम्पॅटेपेटिक (स्नायू आणि मज्जातंतूच्या एकत्रित सहभागाने होणारे काम) प्रक्रिया आराम आणि पचन कार्यात व्यस्त होते. त्यामुळे अन्नपचन आणि शारीरिक प्रक्रियांसाठी पाण्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो.


जळजळ होण्याची शक्यता

उभ्याने प्यायलेले पाणी अन्ननलिकेच्या खालील भागावर जोरदार आघात करते. त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्थायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहोचण्याचा धोका असतो. त्यामुळे पोटात जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो. तसंच पाणी पोटात वेगाने येत असल्याने आम्लाची हालचालही वेगाने होते. त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होतो.


जेवणाप्रमाणेच पाणीही बसून प्यायलं पाहिजे. जेणेकरुन शरीरामधील आम्लाच्या (अ‍ॅसिडच्या) प्रमाणात समतोल राखला जातो. एका विशिष्ट रचनेत जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपल्या शरीरावर प्रेशर येत असतं. त्या प्रेशरसाठीच आपण जेवण बसून करतो. त्याचप्रमाणे पाणी ही बसून प्यायलं, तर त्याचा शरीराला फायदाच होणार आहे.

डॉ. परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती



हेही वाचा

उन्हात बाहेर पडताना घ्या 'ही' काळजी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा