Advertisement

उन्हात बाहेर पडताना घ्या 'ही' काळजी!

आपल्या शरीरातली आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आपण अनेक प्रकार करून बघतो. पण इतर कोणत्याही उपायांपेक्षा शरीरातलं पाणी हा उन्हाळ्यात सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो.

उन्हात बाहेर पडताना घ्या 'ही' काळजी!
SHARES

साधारणपणे, होळी सणाच्या नंतर गरमी सुरु होते. मुंबईत मात्र गेल्या ३ दिवसांपासून पारा ३७ अंशांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे सकाळी १० च्या दरम्यान जरी घराच्या बाहेर पडलात, तरी कडक उन्हाचे चटके करावे लागतात. अशा परिस्थितीत आपल्या शरीरातली आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आपण अनेक प्रकार करून बघतो. पण इतर कोणत्याही उपायांपेक्षा शरीरातलं पाणी हा उन्हाळ्यात सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो.

उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाण्याचं सेवन तुमची अनेक समस्यांपासून सुटका करू शकतं. जर खूप उन्हात फिरत असाल, तर स्वतः सोबत एक पाण्याची बाटली नेहेमी ठेवा. आणि खाली बसूनच पाणी प्या.

तुमच्या चेहऱ्याच्या काळजीसाठी घरातून बाहेर पडतानाच चेहऱ्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधा. ज्यामुळे उन्हाचे चटके तुमच्या चेहऱ्याला बसणार नाहीत. त्यासोबतच शरीर झाकेल एवढे कपडे घाला. जास्त घट्ट कपडे वापरणं टाळा, ज्यामुळे शरीरावर रॅशेस येऊ शकतील.

उन्हात बाहेर पडताना टोपी, छत्रीचा वापर करा. उकाड्यामुळे कुणाला चक्कर आली, तर त्याला सावलीत घेऊन जा. त्याच्या डोक्यावर थंड पाण्यात भिजवलेले कापड ठेवा.

उकाड्याचा ताण कमी करण्यासाठी अनेकदा रस्त्यावरील सरबत, शीतपेय घेतले जातात. त्यामुळे काही काळापुरता उष्मा कमी होतो. पण, त्यामुळे विषाणुसंसर्गाने खोकला, सर्दी, ताप होऊ शकतो. काही वेळा विषाणुसंसर्गाने पोटदुखी, जुलाब होण्याचीही शक्यता असते.

उन्हाळ्याच्या दिवसांत किमान दोन वेळा तरी संपूर्ण चेहरा धुतला पाहिजे. यासाठी योग्य त्या क्लिंजरचा वापर करा. सकाळी तसेच संध्याकाळी चेहरा धुण्याची सवय लावा. याशिवाय त्वचेला टोनिंग केल्याने बंद झालेली रोमछिद्रे उघडली जातात. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.

रोज 7-8 तासांची झोप घ्या. शांत झोपेमुळे तुमच्या आरोग्यासोबतच त्वचेचे देखील संरक्षण होते.

० कलिंगड, द्राक्ष आणि लिंबू यापासून बनवलेल्या पदार्थांचं सेवन करा. जास्तीत जास्त फळांचे सेवन केले पाहिजे.



हेही वाचा

पाणी कसं आणि किती प्यावं?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा