Advertisement

2030 पर्यंत मुंबई रेबीजमुक्त करण्याचा पालिकेचा निर्धार

सध्या बीएमसी संचालित आरोग्य सुविधांमध्ये अशी 163 केंद्रे कार्यरत आहेत.

2030 पर्यंत मुंबई रेबीजमुक्त करण्याचा पालिकेचा निर्धार
SHARES

जागतिक रेबीज दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 2030 पर्यंत मुंबईला रेबीजमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. 

‘मुंबई रेबीज निर्मूलन कार्यक्रम’ (MREP) या उपक्रमाचा एक भाग म्हणून ही घोषणा करण्यात आली. हा कार्यक्रम 2023 मध्ये ‘मिशन रेबीज’ या जागतिक संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत शहरातील एक लाखाहून अधिक कुत्र्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी, जनजागृती मोहीम आणि संरचित आरोग्य शिक्षण सत्र यांचा समावेश आहे. योग्य देखरेखीसाठी GPS ट्रॅकिंग आणि WVS मोबाईल अॅप्लिकेशन यांसारखी आधुनिक डिजिटल साधने वापरण्यात येत आहेत.

रेबीज प्रतिबंधक लसीकरण (ARV) केंद्रांचे मजबूत जाळे निर्माण करण्यात आले. सध्या BMC चालवलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये अशी 163 केंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी 70 केंद्रांमध्ये कामगार नागरिकांना सोय होण्यासाठी संध्याकाळीही सेवा दिली जात आहे.

कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र रेबीज वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. तसेच, BMC रुग्णालयांत सतत रेबीज प्रतिबंधक लस आणि इम्युनोग्लोब्युलिन उपलब्ध करून दिले जात आहेत.

महानगरपालिकेकडून उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये सुमारे एक लाख कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. मात्र, त्यापैकी 15 ते 20 टक्के घटना या डुप्लिकेट नोंदी आणि मुंबईबाहेरील रुग्णांच्या होत्या, असे स्पष्ट करण्यात आले.

सार्वजनिक संदेशात BMC आयुक्त आणि प्रशासक भुशन गगराणी यांनी रेबीज निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. यावर्षीच्या जागतिक रेबीज दिनाची संकल्पना “Act Now: You, Me, Community” नागरिकांना स्मरण करून देत त्यांनी नमूद केले की रेबीज प्रतिबंधाची जबाबदारी केवळ एका संस्थेपुरती मर्यादित नाही. 

शहरातील प्राणीसंख्या नियंत्रणासाठी भटक्या कुत्र्या-मांजरींची नसबंदी करण्यासारखी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यावर्षी एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत आणि सुमारे 75,000 नागरिकांपर्यंत जनजागृती कार्यक्रम पोहोचले.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा