Advertisement

पाणी कसं आणि किती प्यावं?


पाणी कसं आणि किती प्यावं?
SHARES

शरीरासाठी आवश्यक असलेलं घटक म्हणजे पाणी. पाण्यामुळे अनेक आजारांपासून दूर राहणं शक्य होतं. पण, पाण्याचं अतिप्रमाणात सेवन कधी-कधी हानिकारक ठरू शकतं. एका तासात एक ग्लासभर पाणी पिणं हे प्रमाण योग्य असल्याचं अनेकदा किडनीविकारतज्ज्ञ सांगतात.

दररोज एक तासाला एक ग्लास पाण्याचं सेवन हे प्रमाण शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे किडनीला काम मिळतं. आपली किडनी फिल्टरेशन करत असते. त्यामुळे आपल्याला लघवीला होतं. या सवयीमुळे मुतखड्याचा त्रास टाळता येऊ शकतो.


पाण्याच्या सेवनाचे फायदे

  • जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणी प्यायल्यानं खाल्लेलं अन्न चांगलं पचतं. पण, जेवण झाल्यानंतर पाणी पीणं अत्यंत चुकीचे आहे. हे आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतं.
  • आंघोळीला जाण्यापूर्वी नियमितपणे एक ग्लास पाणी पिण्याची सवय ठेवा. त्यामुळे रक्तदाब संतुलीत राहण्यात मदत होते. ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लडप्रेशरची समस्या आहे, त्यांनी तर ही सवय लावून घ्यायलाच हवी.
  • रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिणं खूप चांगली गोष्ट आहे. दररोज ते करा. त्यामुळे हृदयविकाराला लांब ठेवता येत.
  • दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाण्यात दोन मोठे चमचे मध आणि त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घालून प्या. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहून कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं.
  • पाणी घटाघट न पिता ते हळुवार बसून प्यायला हवं. कारण, त्यामुळे तोंडात जी लाळ तयार होते ती पोटातील अन्न पचवण्यासाठी आम्ल तयार करण्यासाठी फायद्याची ठरते.
  • पाणी कधीही बसूनच पिणं चांगलं. त्यामुळे निर्माण होणारे क्षार पोटात अन्नाचे चांगले पचन करतात. पोटात ठराविक प्रमाणात पाणी असेल तर विकार होत नाहीत.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा