Advertisement

आंब्याचे 'हे' भन्नाट पदार्थ नक्की ट्राय करा!


आंब्याचे 'हे' भन्नाट पदार्थ नक्की ट्राय करा!
SHARES

आंबा खायला कुणाला नाही आवडत? लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अगदी प्रिय! आंबाच काय, आब्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ देखील सर्व चवीनं खातात. एप्रिल-मे महिना म्हणजे आंब्याचा सीजन. त्यामुळे तुम्हाला अनेक ठिकाणी आंब्यापासून बनवण्यात आलेले भन्नाट पदार्थ चाखता येणार आहेत.


१) मँगो मिल्कशेक

'यहाँ से पचास पचास कोस दूर गाँव जब बच्चा रात को रोता है, तो माँ कहती है, सो जा बेटा, नहीं तो गब्बर आ जाएगा,' हा फेमस डायलॉग सर्वांनाच माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल मिल्कशेकचा आणि गब्बरचा काय संबंध? सो आम्ही तुम्हाला सांगतो गब्बर आणि खाण्याचा काय संबंध आहे तो!



हा आहे गब्बर मिल्कशेक! एका भल्यामोठ्या ग्लासमध्ये थिक मँगो शेक, त्यावर आईस्क्रिम, मँगो चंक्स आणि चॉकलेट वेफर रोलनं मस्तपैकी सजवून सर्व्ह केलं जातं. हा मिल्कशेक एकानं संपवायचं म्हणजे मोठं टास्कच असतं.

कुठे? - बंटी ज्यूस, साई सदन, रोशन नगर, चंदावरकर लेन, बोरिवली


२) मँगो फ्रीकशेक

उन्हाळा म्हटलं की ज्यूस, मिल्कशेक झालंच...पण 'केक्स अॅन केमिस्ट्री'नं मात्र पुढचं पाऊल टाकलं आहे. 'केक्स अॅन केमिस्ट्री' मँगो फ्रीकशेक नावाचा भन्नाट प्रकार घेऊन आली आहे. फ्रीकशेक म्हणजे काय? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. फ्रीकशेक हा मिल्कशेकचा पप्पा आहे, असं समजलात तरी चालेल! खालचा फोटो पाहून तुम्हाला अंदाज येईलच.



याला साधा सुधा मिल्कशेक मुळीच समजू नका... इथं एका भल्या मोठ्या जारमध्ये मँगो शेक सर्व्ह केला जातो. अस्सल मजा तर यावरील टॉपिंग्समध्ये आहे. या मँगो मिल्कशेकवर क्रीम, मँगो सिरप, मँगोचे स्लाईस, स्ट्रॉबेरी वेफर रोल, जेली आणि मँगो चंक्सचं टॉपिंग करण्यात येतं.

कुठे? - केक्स अॅन केमिस्ट्री, शॉप ५, मेघाल इंडस्ट्रीयल इस्टेट, देवीदयाल रोड, मुलुंड


३) मँगो सँडव्हिच

मिल्कशेकनंतर सर्वांच्या आवडीचा पदार्थ असेल तर तो आहे आईस्क्रिम. आईस्क्रिम देखील चिमुकल्यांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडतं. आईस्क्रिम तर सगळीकडे मिळतं. मग इथं असं काय खास आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मग तुम्हाला मी सांगते इथली खासियत म्हणजे आईस्क्रिम सँडव्हिच!


सौजन्य

आईस्क्रिम आणि सँडव्हिचचा मिलाप तुम्हाला इथं पाहायला मिळेल. सध्या त्यांच्याकडे मँगो सँडव्हिचसाठी तुफान गर्दी आहे. दोन मँगो फ्लेवरच्या वेफर बिस्किटांमध्ये मँगो फ्लेवर आईस्क्रिमचा एक तुकडा असतो.

कुठे? - के. रूस्तुम, ८७ स्टेडियम हाऊस, अॅम्बेसिडरच्या समोर, वीर नरिमन रोड, चर्चगेट


४) आमरस पुरी

एप्रिल-मे महिना सुरू झाला की अनेकांना आमरस-पुरीचे वेध लागतात. अनेक घरात आठवड्यातून एकदा तरी आमरसाचा बेत आखला जातो. पण एकदा तरी तुम्ही फोर्ट इथल्या 'पंचम पुरीवाला'कडची आमरस पुरी ट्राय कराच. आंब्याच्या सीजनमध्ये इथं आमरस-पुरी खाण्यासाठी प्रचंड गर्दी असते.



कुठे? - पंचम पुरीवाला, ८/१०, पेरीन नरिमन सेंट, बोराबाजार प्रिसिंट, फोर्ट


५) मँगो चीज केक


चीज केक तर आपण खातोच. पण या चीज केकची बातच काही और! कारण चीज केक आणि आंबा या भन्नाट कॉम्बिनेशनचा आस्वाद तुम्ही इथं घेऊ शकता. आंब्याच्या स्लाईसनं या चीज केकवर टॉपिंग करण्यात येतं. त्यामुळे पाहताच क्षणी तुम्ही या चीजकेकच्या नक्कीच प्रेमात पडाल.

कुठे? - लव अॅण्ड चीज केक (मुंबईत याचे अनेक आऊटलेट्स आहेत)


६) मँगो फ्रेश क्रीम


'हाजी अली ज्यूस सेंटर' हे मुंबईत प्रचंड प्रसिद्ध आहे. इथं ज्यूसपासून मिल्कशेकपर्यंत सर्व काही मिळतं. मँगो सीजन असल्यानं त्यांनी मँगो फ्रेश क्रीम हे नवीन लाँच केलं आहे. थिक क्रिम आणि मँगो चंक्स अशा कॉम्बिनेशनमध्ये हा भन्नाट प्रकार सर्व्ह केला जातो.

कुठे? - हाजी अली ज्यूस सेंटर, लाला लाजपत राय रोड, हाजी अली सर्कल, महालक्ष्मी



हेही वाचा

आंबा कसा ओळखाल? काय काळजी घ्याल?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा