या आईस्क्रीममध्ये दडलंय काय ?

Mumbai
या आईस्क्रीममध्ये दडलंय काय ?
या आईस्क्रीममध्ये दडलंय काय ?
या आईस्क्रीममध्ये दडलंय काय ?
या आईस्क्रीममध्ये दडलंय काय ?
या आईस्क्रीममध्ये दडलंय काय ?
See all
मुंबई  -  

मुंबईचा जीव कासावीस करणारा उन्हाळा. रणरणतं ऊन आणि रखरखीत वातावरण. दररोज तमाम मुंबईकरांच्या अंगाची अक्षरश: लाही लाही होते. अशा वातावरणात काही तरी थंडगार घशाखाली उतरावं असं वाटत असतं. मग काय! हॉट हॉट वातावरणात ठंडा ठंडा आईस्क्रीम खायला कुणाला नाही आवडणार? तसं तर आईस्क्रीम म्हटलं तर कधीही आणि कोणत्याही मोसमात खाण्याची गोष्ट. खास हिवाळ्यात आईस्क्रीम खाणारेही खवय्ये कमी नाहीत. पण उन्हाळी वातावरणात गारेगार आइस्क्रीम खाण्याची मजा काही औरच! चॉकलेट, व्हॅनिला, पिस्ता, बटरस्कॉच, कसाटा, मँगो, ब्लॅक करंट... एक ना अनेक... आइस्क्रीम म्हटलं की यातले अनेक प्रकार डोळ्यांसमोर हा हा म्हणता येतात आणि मग तुम्ही ते हो हो म्हणता घेता. घेता की नाही? आता तर आईस्क्रीममध्ये असले भन्नाट फ्लेवर्स आणि प्रकार की कुठला खाऊ आणि कुठला नको असाच प्रश्न तुम्हाला पडेल! कोणते प्रकार? तो फिर ए लो ठंडा ठंडा आईस्क्रीssssम...

महाराजा मसाला पान

किंग्स सर्कल येथील 'डेरी डॉन'मध्ये महाराजा मसाला पान हा एक भन्नाट आयटम मिळतो. तुम्ही म्हणाल महाराजा मसाला पान आणि आईस्क्रीम? संबंध काय? पण यातच तर खरी मजा आहे. एखाद्या पुरचुंडीसारखं बांधलेलं त्रिकोणी आकाराचं चांदीचा वर्ख चढवलेलं हिरवंगार पान, त्यावर खोचलेला एक लवंग आणि पानाच्या खालच्या बाजूला लालबुंद चेरी. पण थांबा... या पानाची खरी गंमत येते ती ते खाल्ल्यावर. कारण पान खाल्ल्यानंतर तुम्हाला साक्षात्कार होतो की या पानात कोणतीही काथ्या किंवा टुटीफ्रुटी नसते. तर यात असतं ते पानमसाला फ्लेव्हरचं भन्नाट आईस्क्रीम! आहाहाहा... अगदी पान खात असल्यासारखंच वाटलं ना?

फक्त ४० रुपयात या पानमसाला आइस्क्रीमची चव तुम्ही चाखू शकता. शॉपवर खायला वेळ नाही? वरी नॉट. तुम्ही हे पान पार्सल करुनही घरी घेऊन जाऊ शकता. अगदी दहा ते पंधरा दिवस हे पान आइस्क्रीम फ्रीझरमध्ये टिकतं.

गुलाबजाम कुल्फी

गुलाबजाम कुल्फी हे डेरी डॉनचं आणखी एक खास वैशिष्ट्य. मलई कुल्फीमध्ये गुलाबजाम फ्लेव्हर. कुल्फीला उभं कट केलं की आत असतो गुलाबजाम. म्हणजे कुल्फीसोबतच गुलाबजाम खाण्याचाही अनुभव तुम्हाला घेता येईल.

आजपर्यंत तुम्ही गुलाबजाम नुसते खाल्ले असतील. पण कुल्फीत स्टफ केलेला गुलाबजाम जरा नाही तर खूपच हटके आहे. एकदा खाल्लात तरी पुन्हा पुन्हा खाण्याचा मोह तुम्हाला आवरताच येणार नाही.

सँडविच आईस्क्रीम

डेरी डॉनची आणखी एक खासियत म्हणजे सँडविच आईस्क्रीम. दोन्ही बाजूला व्हॅरपल बिस्कीट आणि मध्ये आईस्क्रिम. मँगो,व्हॅनिला,चॉकलेट असे अनेक फ्लेव्हर तुम्हाला यात चाखता येतील

"डेरी डॉन ही सूरतची कंपनी आहे. त्याच्या शाखा मुंबईतही आहेत. पानमसाला आईस्क्रीम, गुलाबजाम आईस्क्रीम हे खरंतर तिकडे बनवले जातात आणि मुंबईत सर्क्युलेट होतात. पानमसाला आईस्क्रिमला खूप मागणी आहे. लंडन,अमेरिका या देशांमध्येही या पानाची महती पोहोचली आहे. गुलाबजाम आईस्क्रीम हासुद्धा डेरी डॉनचा हटके फ्लेव्हर आहे. असे फ्लेव्हर डेरी डॉनशिवाय तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत.”

- नरेश तलावियामॅनेजर

ही गोष्ट झाली पान आईस्क्रीमची. पण आता आम्ही तुम्हाला जो प्रकार सांगणार आहोत, तो आईस्क्रीम प्रकार ऐकून तुम्ही चाटच व्हाल! इट्स रिअली स्मोकिंग हॉट!

स्मोक आईस्क्रीम

हा व्हीडिओ पाहून तुम्ही म्हणाल ही चिल्ली-पिल्ली स्मोक करतायेत की हुक्का पितायेत. पण घाबरु नका. असं काहीही नाहीये. खरंतर हा अतरंगी प्रकार आहे स्मोक आईस्क्रीम. आईस्क्रीममध्ये तयार होणारा हा स्मोक म्हणजे लिक्विड नायट्रोजन असतो. त्यामुळे आईस्क्रीममधून स्मोक निघतो. हे स्मोक आईस्क्रीम खाल्ले की नाका-तोंडातूनही धूर निघू लागतो. आहे की नाही भारी आयटम ?

जे चॉकोहॉलिक आहेत त्यांचासाठी आईस्क्रिम बार ही जागा बेस्ट आहे. आईस्क्रिम बार येथे चॉकलेट सिगार हा भन्नाट प्रकार आहे. चॉकलेट सिगार म्हणजे चॉकलेट रोल हा लिक्विड नायट्रोजनने भरलेल्या बाऊलमध्ये दिला जातो. एका बाऊलमध्ये चार चॉकलेट रोल असतात. फक्त १०० रुपयाला हे चॉकलेट सिगारचा स्वाद तुम्ही घेऊ शकता. 

- नेमेश गांधी

पुरणपोळी आईस्क्रीम

सणा-सुदिच्या काळात घरोघरी हमखास केला जाणारा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी ही दुधासोबत, तुपासोबत आणि कटाच्या आमटीसोबत खूपच चांगली लागते. पण तुम्ही कधी पुरणपोळी आईस्क्रीम खाल्लंय का? पुरणपोळी आईस्क्रीम असा काही प्रकार असतो हेसुद्धा कदाचित बहुतांश लोकांना माहीत नसेल. पण असा रापचिक आयटम मिळतो तो दादरच्या मराठमोळ्या 'आस्वाद'मध्ये.

पुरणपोळीच्या सारणापासून तयार केलेलं हे आईस्क्रीम तुम्ही एकदा खाल्ल्यावर तुमचं मन नाही भरणार.आईस्क्रीमसोबत डीप करायला कटापासून तयार केलेला सॉसहम्म्म...जबरदस्त टेस्टकिती तरी वेळ ती टेस्ट जीभेवर रेंगाळत राहील यात शंकाच नाही!

आय स्क्रीम,यु स्क्रीम,वुई ऑल लव्ह आयस्क्रीम... मग ट्राय करणार की नाहीहे भन्नाट आणि हटके आईस्क्रीम्स? आणि यापैकी कोणते आईस्क्रीम तुम्हाला आवडले हे कळवायला विसरू नका.

फोटो - गणेश रहाटे

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.