सत्यता देवगड आंब्याची...

Mumbai
सत्यता देवगड आंब्याची...
सत्यता देवगड आंब्याची...
सत्यता देवगड आंब्याची...
सत्यता देवगड आंब्याची...
See all
मुंबई  -  

सत्य 1: कुठला तर... देवागडचा

आंबा. फळांचा राजा. कुठेही फळ बाजारात जा आणि आंबा विचारा..."कुठला रे?"... उत्तर मिळते देवगड किंवा रत्नागिरी. एकही विक्रेता देवगड, रत्नागिरी शिवाय नाव घेणार नाही. असे वाटते की देवगड- रत्नागिरी शिवाय आंबाच पिकत नाही! कर्नाटकचा, मद्रासचा विचारले तर "हमारे यहा नही मिलेगा", असे उत्तर मिळाले.

सत्य 2: बाजारातील पिवळा आंबा

काल परवा वाशी एपीएमसी (APMC) बाजारात फेरी मारली तर सर्वत्र आंब्याचे साम्राज्य दिसले. परंतु त्याची दरवळ काही आली नाही. रंग आकर्षक आणि संपूर्ण पिवळा धम्मक. जणू काही प्रत्येक आंबा रंगवला आहे. रंगाची कमाल कुठल्या रासायनशस्त्रात दडलीय हे मात्र संबंधित शासकीय विभागाच ठरवू शकेल. कोकणी माणूस रंग बघून हळूच म्हणतो "यो आमचो आंबो नाय". कोकणात आडित किंवा गवताच्या पासेत/ कोंदणात टाकल्यावर सुद्धा इतका एकसंध रंग कधीच येत नाही.

सत्य 3 : देवगड आंबा

त्यातल्या त्यात सर्वात जास्त लोकप्रिय आंबा म्हणजे देवगडचा. अर्थात थोडा अधिक भाव खाणारा. सध्या देवगड बाजारात (स्थानिक) 375 रुपयें डझनाने विकणारा आंबा ( 200 ते 250 ग्रॅम) आणि 450 रुपये ( 250 ते 300 ग्रॅम) . हा आंबा भाव अर्धा पिकलेला. जर कच्चा घेतला असता तर भाव अजून 50 रुपये कमी. एक डझनाची पेटी घेतली तर महाग पण पाच डझनाची थोडी स्वस्त पडते.

पूर्ण तयार झालेला कच्चा आंबा आडीत ( नैसर्गिक रित्या गवतात पिकवणे) टाकला जातो. त्यात साधारणतः 5 टक्के आंबा डागी किंवा विकता न येणारा असतो. त्यानंतर विक्रीयोग्य आंबा बॉक्समध्ये भरून शहरात येतो. त्यासाठी एक डझन बॉक्सला साधारणतः 50 रुपये प्रवास खर्च येतो. जितका जास्त मोठा बॉक्स असेल तर प्रवास खर्च कमी होऊ शकतो. परंतु किमान हाताळणी तत्वावर एक डझन बॉक्स किरकोळ विक्रीसाठी ठेवला जातो. बॉक्सचा खर्च अंदाजे 15 रुपये. भरणी पिकवणे आणि इतर 10 रुपये खर्च डझना मागे. म्हणजे 75 रुपये खर्च जागेवर होतो.

कुठलीही रासायनीक प्रक्रिया नाही. गवतात पिकलेला आंबा. आंब्याचा सुगंध हीच शुद्धतेची साक्ष, प्रत्यक्ष नाकाजवळ सुद्धा नेण्याची गरज  नाही म्हणजे साक्षात देवगड आंबा. आज देवगड आंबा नावावर मद्रास हापूस, कर्नाटक हापूस, आंध्र हापूस आणि अन्य ठिकाणाचा माल विकला जातो. परंतु प्रत्यक्ष देवगड शेतकरी आंबा देत असल्यास खात्रीचा आंबा. सदर आंबा एप्रिल अखेरपर्यंत मिळणे अपेक्षित आहे.

रत्नागिरी हापूस, बऱ्यापैकी गुण देवगडचेच पण दरात 50 ते 100 रुपये देवगडपेक्षा कमी

आंबा विक्रीसाठी विक्रेता शहरात काम करतो. त्याचा खर्च प्रत्येकि दिवसाचा रुपये 400 म्हणजे प्रत्येक ठिकाणासाठी 2 जणांचे रुपये 800. इतर जेवण खर्च 200 मिळवून एकूण खर्च दिवसाचा रुपये 1000. दिवसाचा जास्तीत जास्त 50 डझन विक्री पकडता खर्च डझना वारी 20 रुपये. ओपेशन व्यवस्था खर्च डझनावारी रुपये 10. 10 टक्के घसारा, माल उरणे, खराब होणे इत्यादी. थोडक्यात 45 आणि 35 रुपये प्रत्येकी डझन. भाडे आणि इतर खर्च इथे पकडला गेला नाही.

एकूण खर्च 1 नंबर आंब्यासाठी 450 + 75 + 75 = 600
एकूण खर्च 2 नंबर आंब्यासाठी 375 + 75 + 65 = 515

विक्री किंमत 1 नंबर (250 ते 300 ग्रॅम) रुपये 700 ते 750
विक्री किंमत 2 नंबर (200 ते 250 ग्रॅम) रुपये 600 ते 650

फायदा @ 15 टक्के

थोडक्यात निर्यातक्षम 1 क्रमवारीचा आंबा 700 रुपयाच्या खाली मिळणे दुरास्पत असताना बाजारात मात्र विक्रेते मंडळी 400 ते 450 मध्ये सदर आंबा सहजतेने विकतात. खरे काय आहे ते समजायला आपण सुज्ञ आहोत.

सत्य 4: केमिकल लोचा
वर सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक प्रक्रियेतील आंब्याला पिकवण्यासाठी ठराविक काळ जावा लागतो. पण विक्रेते तसेच व्यापारी ( काही सन्माननीय अपवाद वगळता) यांना झटपट पैसे कमवायचे असतात. मग मार्ग निघतो इथेनॉल चेम्बरचा, पुडीचा, पावडरचा, स्प्रे चा कमी अधिक प्रमाणात केमिकल लोचा.

सदर भाव एप्रिल दुसऱ्या आठवड्यातील आहेत आणि दिवासागणीक कमी होत जातील.

तरी आपण ठरावा... चांगला देवगड/ रत्नागिरी आंबा कितीला घ्यायचा आणि कसा घ्यायचा?

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.