Advertisement

जेवणातच नाही तर 'या' कारणांसाठी देखील तमालपत्र फायदेशीर

तमालपत्रात अनेक औषधी गुण आहेत. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांची मात्रा अधिक आहे. त्यामुळे तमालपत्राचा जेवणात वापर हा फायदेशीर असतो. पण तमालपत्राचा वापर फक्त खाण्यासाठीच नाही, तर इतर गोष्टींसाठी देखील केला जातो.

जेवणातच नाही तर 'या' कारणांसाठी देखील तमालपत्र फायदेशीर
SHARES

तमालपत्राचा (दालचिनीचे पान) जास्त वापर हा भारतीय मसाल्यांमध्ये केला जातो. पण तमालपत्र फक्त जेवणाचीच चव वाढवत नाही, तर ते तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. तमालपत्रात अनेक औषधी गुण आहेत. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांची मात्रा अधिक आहे. त्यामुळे तमालपत्राचा जेवणात वापर हा फायदेशीर असतो. पण तमालपत्राचा वापर फक्त खाण्यासाठीच नाही, तर इतर गोष्टींसाठी देखील केला जातो.



१) घरात उंदीर आणि चिचुंद्रीनं धुमाकूळ घातला असेल, तर घराचे कोपरे, किचन आणि कपाटात तमालपत्र ठेवावे. उंदरांना तमालपत्राचा वास सहन होत नाही. तमालपत्राच्या वापरानं उंदीर घरातून पळ काढतील.


२) तमालपत्राचा वापर झुरळं पळवण्यासाठी देखील केला जातो. किचन आणि कपाटाच्या कोपऱ्यांमध्ये किंवा झुरळं असलेल्या ठिकाणी एका प्लेटमध्ये तमालपत्र जाळून त्याचा धूर करा. याच्या वासामुळे झुरळं बाहेर जातील.


३) तमालपत्र आणि थोडेसे मीठ पाण्यात टाकून उकळून घ्या. ज्या ठिकाणी मुंग्या आहेत तिथे स्प्रे करा.

४) तमालपत्र पाण्यात टाकून उकळून त्याची वाफ घ्या. तुम्हाला फ्रेश वाटेल.

५) केसात कोंडा झाला असेल तर यावर तमालपत्र उपयुक्त आहे. तमालपत्र आणि दही मिसळून केसांमध्ये लावून केस धुवा. कोंडा दूर होईल.



६) केसांमध्ये उवा झाल्या असतील, तर तमालपत्र पाण्यात उकळून घ्या. ते पाणी गार करून त्यानं केस धुवून घ्या. महिन्यातून २ ते ३ वेळा हे केल्यावर उवा कमी होतील.

७) तमालपत्र बारीक करून चाळून घ्या. आठवड्यातून दोन वेळा याने दातांना मसाज करा. पिवळेपणा कमी होईल.


८) शरीरावर कुठे मुका मार किंवा इतर काही कारणांमुळे वेदना होत असतील, तर तमालपत्राच्या तेलानं मसाज करा.

९) बाजारात असणाऱ्या रूम फ्रेशनरचा वापर करण्यापेक्षा तमालपत्राचा वापर करावा. यासाठी तमालपत्र, लवंग आणि दालचिनी पाण्यात उकळा. आता हे पाणी कापसात डिब करून रुममध्ये ठेवाहे रूम फ्रेशनरचे काम करेल.

१०) तेजपत्ता तांदूळडाळ किंवा एखाद्या धान्यात ठेवात्यामुळे त्यात कुठलेच किडे होणार नाहीत.



हेही वाचा

मध खाण्याआधी 'हे' नक्की वाचा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा