Advertisement

वापरलेल्या टी बॅग्ज फेकू नका! त्यांचे 'असे'ही वापर होतात!

वापरलेला टी बॅगचा रोजच्या आयुष्यात वापर करता येऊ शकतो. हाऊस कीपिंग, प्लान्ट, हेल्थ, ब्यूटी आणि कुकिंगसोबत अनेक प्रकारचे काम सोपे होते. टी बॅग वापरून झाल्यानंतर त्या पुन्हा कशा वापरात येतील? याच्या या काही टिप्स...

वापरलेल्या टी बॅग्ज फेकू नका! त्यांचे 'असे'ही वापर होतात!
SHARES

टी बॅग्स फक्त काही मिनिटांमध्ये चहा तयार करण्याचे काम करते. पण याचे अजून काही फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? बहुतेक घरांमध्ये ग्रीन टीचे सेवन केले जाते. पण टी बॅगचा वापर झाल्यानंतर ती टाकून दिली जाते. पण त्या वापरलेला टी बॅगचा रोजच्या आयुष्यात वापर करता येऊ शकतो. हाऊस कीपिंग, प्लान्ट, हेल्थ, ब्यूटी आणि कुकिंगसोबत अनेक प्रकारचे काम सोपे होते. टी बॅग वापरून झाल्यानंतर त्या पुन्हा कशा वापरात येतील? याच्या या काही टिप्स...


१) वुडन फर्निचर, खराब काच आणि लिनोलियम टाइल्सचे फ्लोअर टी बॅगनं स्वच्छ करता येतात.



2) बुटांमध्ये टी बॅग टाकून ठेवल्यास त्यांचा वास कमी होतो.



3) शॅम्पू केल्यानंतर ग्रीन टीनं केस धुवा. यामुळे केसांमध्ये शाईन येईल.



4) कोमट पाण्यात टी बॅग्स टाकून त्यामध्ये २० मिनिटं पाय बुडवून ठेवा. त्यामुळे पायाची दुर्गंधी दूर होते.



5) घरातच खत तयार करण्यासाठी बेस्ट मटेरियलमध्ये वापरलेल्या टी बॅग्स किंवा चहापत्ती टाका. यामुळे अॅसिड प्रोड्युसिंग बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होतात आणि खत लवकर तयार होते.



6) कुंड्यांमध्ये प्लान्ट्स लावण्याअगोदर वापरलेल्या टी बॅग्स टाका. हे पाणी होल्ड करण्यास मदत करतील आणि मातीला न्यूट्रिशियन देतील.



7) हातांचा लसूण, कांदा किंवा माशांचा वास जात नसेल, तर वापरलेल्या टी बॅग्सचा वापर करा.



8) आंघोळ करताना पाण्यात टी बॅग्स टाका. यामुळे पुरळ आणि चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतील.



9) टी बॅग्सचा वापर उंदीर पळवण्यासाठी देखील करता येतो. त्यामुळे कपाटात टी बॅग्स ठेवा.



10) दोन मिनिटे गार पाण्यात दो टी बॅग टाका आणि डोळ्यांवर ठेवा. लाल डोळे होण्याच्या त्रासापासून आराम मिळेल.



11) दातांमध्ये वेदना होत असतील, तर पेपरमिंट फ्लेवर्सचे टी बॅग आणि चिमूटभर मीठ पाण्यात टाकून गुळण्या करा. पेपरमिंट अँटी-सेप्टिक आहे. त्यामुळे वेदना कमी होतात.



12) तोंडातून वास येत असल्यास टी बॅग्स दातांवर घासा. त्यामुळे तोंडाचा वास निघून जाईल.




हेही वाचा

शेविंग क्रिमचा 'हा' वापर माहित आहे का?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा