Advertisement

शेविंग क्रिमचा 'हा' वापर माहित आहे का?


शेविंग क्रिमचा 'हा' वापर माहित आहे का?
SHARES

कपड्यांवर कधी डाग पडला की आपण अनेक घरगुती उपाय करतो. लिंबू, बेकिंग सोडा अशा गोष्टींचा वापर अनेकदा आपण केला आहे. आता यात आणखी एक नाव अॅड झालं आहे ते म्हणजे शेविंग क्रिम! शेविंग क्रीमचा वापर फक्त पुरुष करतात हे सर्वांनाच माहीत असेल. पण शेविंग क्रिमचा वापर महिलाही करू शकतात. तुम्ही म्हणाल असं कसं? महिला काय शेव करतात? मग त्यांना शेविंग क्रीमची काय गरज? पण फक्त शेविंग करण्यासाठीच क्रीमचा वापर होत नाही. तर शेविंग क्रीमचा इतर गोष्टींसाठी देखील वापर होतो. फक्त महिलाच नाही तर कोणीही शेविंग क्रीमचा वापर इतर कारणांसाठी करू शकतो.


1) कपड्यावर वाईन, ड्रिंक किंवा एखाद्या पदार्थाचे डाग लागले आहेत? मग त्या भागावर शेविंग क्रीम लावून स्क्रब करा आणि त्यानंतर वॉश करा.



2) पायांच्या भेगांवर शेविंग क्रीममध्ये माऊथवॉश मिसळून लावाकाही वेळानंतर साध्या पाण्यानं धुऊन टाका. पण यामुळे पाय थंड पडतील.


3) घरातील काच किंवा कारची काच शेविंग क्रीमने क्लीन करा. शेविंग क्रीम हे फॉग प्रूफ आहे.


4) हातावर लावलेलं ग्रीस निघत नसेल, तर शेविंग क्रीमचा वापर कराशेविंग क्रीम हातावर लावा आणि कपड्याने क्लीन करा घ्या.



5) कारपेटवर लागलेले चहा किंवा कॉफीचे डाग घालवण्यासाठी त्या ठिकाणी शेविंग क्रीम लावा. काही वेळानंतर कपड्याने हलकेसे पुसून घ्या. स्क्रब करू नका.



6) सिल्वर ज्वेलरी काळी पडली असेल तर शेविंग क्रीम लावून ब्रशने स्क्रब करावं. पुन्हा ज्वेलरीला शाईन येईल आणि नव्यासारखी वाटेल.



7) बाथ टब किंवा बाथरुमचे टाईल्स क्लीन करण्यासाठी शेविंग क्रीमचा वापर कराटाईल्सच्या जॉईंटमधला कचरा साफ होईल.



8) शूज किंवा फूटवेअरवर ऑईलचे किंवा मातीचे डाग पडले असतील, तर शेविंग क्रीम फायदेशीर ठरेल. शेविंग क्रीम लावून थोडा वेळ तसेच ठेवा. नंतर कपड्यानं क्लीन करा.


9) स्टीलच्या भांड्यांवर पडलेले डाग घालवण्यासाठी शेविंग क्रीमचा वापर करा आणि पाण्याने न धुता कपड्याने क्लीन करा.



हेही वाचा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा