Advertisement

तांब्याच्या भांड्यातील पाणी सेवन करा आणि आजारांना पळवा


तांब्याच्या भांड्यातील पाणी सेवन करा आणि आजारांना पळवा
SHARES

धातूच्या भांड्यातून खाणं-पिणं शरीरासाठी फायदेशीर असल्याचं अनेकदा आपल्या घरातील ज्येष्ठांनी सांगितलं असेल. प्राचीन काळीही जेवण बनवण्यासाठी धातूच्या भांड्यांचा वापर केला जायचा. पण कालांतरानं धातूच्या भांड्यांची जागा स्टील अाणि अॅल्युमिनियमनं घेतली. पण आजही अनेक घरांमध्ये तांब्यांच्या भांड्यांमध्ये पाणी पितात. तांब्याच्या भाड्यातून जेवल्यानं किंवा पाणी पिण्यानं काय फायदे होऊ शकतात, याची माहिती अनेकांना नसेल. हीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.



आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी त्रिदोषहारक म्हणजेच कफ, पित्त, वातमुक्त असतं. त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी नियमित प्यावं. तांब्यात नैसर्गिक जंतूनाशक गुणधर्म आहेत. त्यामुळे पाणी निर्जंतुक होतं

) थायराॅईड नियंत्रित ठेवण्यास याचा फायदा होतो. थायरेक्सिन हार्मोन्सच्या असंतुलनामुळे थायरॉईडचा आजार होतो. तांब्याच्या धातूचा स्पर्श असलेलं पाणी शरीरामध्ये थायरेक्सिन हार्मोन्सना समतोल ठेवतं. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं फायदेशीर आहे

) त्वचा निरोगी ठेवायची असेल तर रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सकाळी उठल्यावर प्या. असं रोज केल्यास तुमच्या त्वचेवर तेज दिसून येईल

) तुम्हाला वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. यासोबतच व्यायमपण सुरू ठेवा. यामुळे शरीरातील एक्स्ट्रा चरबी कमी होते


) तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यानं रक्ताची कमतरता दूर होते. ३० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कितीतरी स्त्रिया रक्ताच्या कमतरतेच्या समस्यानं त्रस्त आहेत. कॉपर या घटकाच्या कमतरतेमुळं असं होतं. पण तांब्याच्या भांड्यातील पाण्याचं सेवन केल्यास शरीरातील कॉपरची कमतरता पूर्ण होते.

) पोटाच्या समस्येवर तांब्याच्या भांड्यातील पाणी फायदेशीर आहे. अॅसिडिटी, गॅस अशा समस्यांवर ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सेवन करावं. यामुळे पचनक्रिया सुधारते

) कर्करोग झाला असल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावं. कारण पाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात. जे या रोगाशी लढण्याची शक्ती प्रदान करतात

) तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी कफ, वात आणि पित्ताची समस्या दूर करतं.


) तांब्याच्या भांड्यातील पाणी शुद्ध मानलं जातं, हे पाणी जुलाब, कावीळ आणि अतिसार यांसारखे आजार पसरवणाऱ्या जीवाणूंना नष्ट करतं

) शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी लाभदायक अाहे

१०) अॅनिमिया म्हणजे अशक्तपणा हा आजार असल्यास तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं फायदा होतो. हे पाणी शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करतं.

११) सांधेदुखी हा सध्या सामान्य आजार झाला आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्यानं शरीरातील युरिक अॅसिड कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सांधेदुखीच्या तक्रारीपासून आराम मिळण्यास मदत होईल.


हेही वाचा

रिकाम्या पोटी लसूण खा आणि निरोगी राहा!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा