रिकाम्या पोटी लसूण खा आणि निरोगी राहा!


  • रिकाम्या पोटी लसूण खा आणि निरोगी राहा!
  • रिकाम्या पोटी लसूण खा आणि निरोगी राहा!
  • रिकाम्या पोटी लसूण खा आणि निरोगी राहा!
  • रिकाम्या पोटी लसूण खा आणि निरोगी राहा!
SHARE

समुद्रमंथनानंतर देव आणि दानव यांच्यात अमृताच्या प्राप्तीसाठी भांडण झाले. या भांडणात अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला. तो थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातील पाच रस घेऊन लसणाचा कोंब बाहेर आला.

लसणासंदर्भात ही कथा प्रचलित आहे. अगदी तुमच्या आजीनं देखील तुम्हाला लहानपणी ही कथा सांगितली असेल. आता या कथेत किती तथ्य आहे हे माहीत नाही. पण लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो याची मात्र फुल्ल गॅरंटी आहे!लसणाचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी किंवा चटणी बनवण्यासाठी केला जातो. एखाद्या भाजीत लसूण घातला की तिची चव नक्कीच वाढते. पण लसूण फक्त पदार्थांची चव वाढवत नाही, तर आरोग्याच्या अनेक कारणांसाठी लसूण फायदेशीर आहे. तुमच्या आहारात लसणाचा समावेश करणं फार आवश्यक आहे. लसूण आपण पदार्थांमधून खातो. पण सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक लसणाची पाकळी खाणं तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. लसनात अॅलिसीन नावाचे रसायन आहे. अॅलिसीन हे अॅण्टिबायोटिकचं काम करतं. त्यामुळे रिकाम्या पोटी कच्चा लसूण चावून खावा आणि त्यावर एक ग्लास पाणी प्यावे.रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे

1) लसणाच्या पाकळ्या सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खाव्यात. त्यामुळे ब्लडप्रेशर (रक्तदाब) नियंत्रणात राहतो.

2) लसूण खाल्ल्यानं रक्ताच्या गाठी बनत नाहीत. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही कमी होते. लसूण आणि मध एकत्र करून खाल्ल्यानं हृदयाच्या धमन्यांमध्ये असलेले ब्लॉकेज दूर होतात. त्यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो.

3) लसणाच्या सेवनानं शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते. तसेच यकृत आणि मूत्राशयाचे कार्य सुरळीत चालू राहण्यास मदत होते.4) डायरिया या विकारामध्ये लसणाच्या सेवनानमुळे आराम मिळतो. यासाठी पाण्यात लसणाच्या सहा-सात पाकळ्या टाकाव्यात. ते पाणी आठ-नऊ मिनिटं उकळवून घ्यावे. त्यानंतर हे पाणी थंड करून रिकाम्या पोटी सेवन करावे. यामुळे शरीरातील निरूपयोगी घाटक पदार्थ शरीराबाहेर फेकले जाण्यास मदत होते.

5) लसणाच्या सेवनामुळे पचनसंस्था चांगली होते. ज्यांना अपचनाचा त्रास होत असेल किंवा भूक कमी लागत असेल त्यांनी नियमित एक तरी लसणाची पाकळी खावी.

6) लसूण अॅसिडिटी होण्यापासून रोखतो. तसेच ताण-तणाव कमी करण्यासही सहाय्य करतो.7) लसूण श्वसनाशी संबंधित विकारांमध्ये फायदेशीर ठरतो. सर्दी, खोकला, अस्थमा, न्यूमोनिया या विकारांमध्ये लसणाचे सेवन फायदेशीर आहे. यासाठी लसूण घालून दूध उकळावे आणि ते पिण्यास द्यावे. त्यामुळे खोकला, दमा या विकारांमध्ये आराम मिळतो.

8) लसूण किटकनाशक असल्यानं टीबीचे विषाणू मरण पावतात.हेही वाचा

हे १० उपाय करा, तुमचीही लाईफ होईल जिंगा लाला!


संबंधित विषय
ताज्या बातम्या