'हे' ११ घरगुती फेसपॅक वाढवतील चेहऱ्याचे सौंदर्य

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी आपण काय काय नाही करत. कुणी सौंदर्यप्रसाधनांचा आधार घेतं तर कुणी पार्लरची वाट धरतं. पण हे तेवढ्यापुरतं असतं. पण तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य दिर्घकाळ ठेवण्यासाठी घरच्या घरी तुम्ही उपाय करू शकता. महागड्या क्रिम किंवा पार्लरमध्ये पैसे घालवण्यापेक्षा हे घरगुती फेस पॅक तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. घरात बनवलेल्या या फेसपॅकमध्ये कुठल्याही प्रकारचं रसायन नसल्यानं त्याचे कुठलेच दुषपरिणाम चेहऱ्यावर होत नाहीत. या फेसपॅकमधून त्वचेला जीवनसत्व, खनिजे मिळतात

) चेहरा फ्रेश वाटावा यासाठी कॉफी आणि मध यांचे मिश्रण केलेला लेप लावावा. यासाठी २ चमचे कॉफीमध्ये एक चमचा मध टाकून त्याचा लेप करावा. हा लेप तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा वापरावा. यामुळे तुमचा चेहरा फ्रेश वाटेल.

) चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी दोन चमचे दुधामध्ये एक चमचा टॉमेटो ज्यूस मिक्स करावे. हे मिश्रण रात्रभर लावून ठेवावं. सकाळी उठलं की पाण्यानं चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा

) चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी दोन चमचे मधामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाका. हा लेप दिवसातून एकदा चेहऱ्यावर लावावा. यामुळं चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतील

) तेलकट चेहरा हा देखील सौंदर्यामधला अडथळा आहे. यावर उपाय म्हणजे दोन चमचे कोरफडीच्या गरामध्ये एक चमचा हळद मिक्स करावी. हा लेप दिवसातून एकदा लावलात तरी चेहरा तेलकट दिसणार नाही.

) निरोगी त्वचेसाठी एक चमचा खोबरेल तेलात दोन चमचे हळद टाकावी. यामुळं तुमचा चेहरा उठावदार दिसेल.

) तुमचा चेहरा उजळण्यासाठी दोन चमचे लिंबाच्या रसात दोन चमचे दही टाकावे. हा लेप लावल्यानं तुमचा चेहरा ग्लो करेल.

) डार्क सर्कल किंवा डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलक्या हातानं मालिश करावी.

) तुमची स्किन खूप ड्राय असेल तर एक चमचा साय घेऊन त्यात थोडेसे केशर मिक्स करा. हा लेप लाऊन चेहऱ्यावर मालिश करावे. थोड्यावेळानं चेहरा धुवून टाकावा. यामुळं चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होईल.

) संत्र्यांची साल वाळवून चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये थोडंसं कच्चं दुध मिसळवून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. थोड्यावेळानं चेहरा धुवून घ्या. यामुळं त्वचा कोमल होईल

१०) मुलतानी माती आणि गुलाब जल एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा रंग निखरतो. चेहऱ्याचा काळपटपणा दूर होईल.

११) तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर केळी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पिकलेली केळी मॅश करून चेहऱ्यावर अर्धा तास लावून ठेवावं.


हेही वाचा  -

तुम्ही भेसळयुक्त पदार्थ तर नाही खात ना? अशी ओळखा भेेसळ


पुढील बातमी
इतर बातम्या