जाणून घ्या सेक्स संदर्भातील ६ गुपित

लैंगीक संबंध आणि त्याच्याशी निगडीत विषयांवर आजही आपल्याकडं उघडपणे बोललं जात नाही. लैंगीक शिक्षण देण्याच्या बाबतीत तर उघड विरोधच आहे. त्यामुळे तरूण आणि प्रौध या दोन्ही पिढ्यांमध्ये लैंगिक गोष्टींबाबत अज्ञान आढळते. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींची माहिती देणार आहोत. प्रणयाबद्दलच्या अशा काही गोष्टी ज्या प्रत्येक पुरुषाला माहिती असणं आवश्यक आहे.

१) सेक्स करण्याआधी जोडीदारासोबत गप्पा मारणं आवश्यक आहे. मग तुम्ही रोमँटिक गप्पा मारल्या तरी चालतील. यामुळे स्त्रियांमध्ये सेक्स करण्याची इच्छा जागृत होते. त्यांच्यासोबत मारलेल्या गप्पा महिलांना पुरुषांकडं आकर्षित करतात.

२) स्त्रियांच्या मनात स्वत:च्या शारीरिक आकर्षकतेबद्दल न्यूनगंड असतो. लग्नानंतर वजन वाढल्याचं अनेकांना जाणवतं आणि महिला पतीस तसं सांगतातही. त्यामुळे आपण आकर्षक दिसत नाही असा महिलांचा समज असतो. त्यामुळे आपल्या नवऱ्याचं आपल्यावरचं प्रेम कमी झालं असं तिला वाटत असतं. यावर एकच उपाय तो म्हणजे तुम्ही तिला याची जाणीव करून दिली पाहिजे की ती, अजूनही तेवढीच आकर्षक आणि सुंदर दिसते. त्यामुळे तिच्या मनात तुमच्याविषयी अधिक प्रेम निर्माण होईल.

३) जोडप्यानं नेहमी लक्षात ठेवावं की आपण एकमेकांशी कसं बोलतो, वागतो याचा आपल्या सेक्स लाईफवर परिणाम होत असतो. जर तुमच्यात वारंवार भांडणं होत असतील तर याचा तुमच्या सेक्स लाईफवर देखील परिणाम होऊ शकतो. भांडणं झाली तरी दोघांनी एकमेकांना मनवून तो विषय तिकडेच संपवणं आवश्यक आहे. दोघांनी एकमेकांना सरप्राईज गिफ्ट देणं, आठवड्यातून एकदा बाहेर फिरायला जाणं किंवा गप्पा मारणं हे तुमच्या सेक्स लाईफसाठीच नाही तर नात्यासाठी देखील चांगलं आहे. यामुळे तुमच्यातील प्रेम अधिक खुलेल.

४) ती केवळ तुमच्या प्रणयातील साथीदार अथवा कुटुंब चालवणारी स्त्री नसून त्यापेक्षा तुमची चांगली मैत्रीण आहे, या नजरेने तिच्याकडे बघा. तिच्याशी तुमच्या समस्या आणि आनंदी क्षण शेअर करा. तुम्ही तिच्यावर प्रचंड विश्वास करता अशी जाणीव तिला होईल.

५) प्रणय फक्त आनंद घेण्यासाठी करा. एक गरज किंवा आवश्यकता म्हणून करू नका. यामुळे तो निरस होतो. सेक्स करताना कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसावं. याचा परिणाम स्त्री-पुरुष या दोघांच्या मनावर होतो.

६) सेक्सनंतर अनेकदा पुरुष झोपून जातात. तर ते योग्य नाही. त्यामुळे स्त्रीला वाटतं की ती फक्त सेक्सपुरती मर्यादित आहे. तिच्या मनात नकारात्मक विचार येतो.


हेही वाचा

कंडोमबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?


पुढील बातमी
इतर बातम्या