Advertisement

कंडोमबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

संततिनियमन आणि लैंगिक संबंधाचा सर्वात योग्य मार्ग म्हणून कंडोम जगभर वापरलं जातं. त्याचा वापर आणि त्याचे फायदे याबाबत सर्वांनाच माहीत असेल. पण कंडोमबद्दलच्या काही मजेशीर गोष्टी तुम्ही कधीच वाचल्या नसतील!

कंडोमबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
SHARES

कंडोम हा शब्द वाचून सर्वांचेच डोळे विस्फारले असतील! 'कंडोम' हा शब्द सार्वजनिक मंचावर एवढ्या उघडपणे थोडी बोलला जातो? असाच अनेकांचा (गैर)समज असतो. मात्र अशा विषयांवर चर्चा करणं यात काहीही चुकीचं नाही. संततिनियमन आणि लैंगिक संबंधाचा सर्वात योग्य मार्ग म्हणून कंडोम जगभर वापरलं जातं. त्याचा वापर आणि त्याचे फायदे याबाबत सर्वांनाच माहीत असेल. पण कंडोमबद्दलच्या काही मजेशीर गोष्टी तुम्ही कधीच वाचल्या नसतील!



) कंडोमचा वापर इ. . पूर्व ११,००० वर्षांपासून होत आहे. प्राचीन काळातही संततीच्या नियमनासाठी कंडोमचा वापर केला जात होता. फ्रान्समधल्या काही प्राचीन लेण्यांमध्ये जुन्या प्रकारच्या कंडोमची काही चित्रे सापडली आहेत.



2) प्राचीन इजिप्तमध्ये कंडोमसाठी प्राण्यांच्या मूत्राशयाचा वापर केला जायचा. त्याचे अवशेष इजिप्तमध्ये उत्खननात सापडले आहेत. माशाची कातडी, चामडे, रेशीम यांपासून बनवलेले कंडोमही प्राचीन काळी वापरले जायचे. ऑस्ट्रेलियाच्या म्युझियममध्ये डुकराच्या आतड्यांपासून बनवलेले कंडोम जतन करून ठेवले आहेत.


3) ग्रॅवलिअल फेलोओपियो यांनी दावा केला की, त्यांनी कपड्यांपासून कंडोम बनवले होते. या कपड्यावर त्यांनी रासायनिक प्रक्रिया केली होती. त्यानंतर त्यांनी जवळपास ११०० पुरुषांना कपड्यापासून बनवलेले हे कंडोम वापरायला दिले. या पुरुषांनी रोगाने ग्रस्त महिलांशी संबंध ठेवला. त्यानंतर या पुरुषांची तपासणी केली असता त्यांना या संबंधातून कुठल्याही प्रकारचा आजार झाला नसल्याचं स्पष्ट झालं.


4) एकोणीसाव्या शतकात जर्मन आणि अमेरिकन आर्मीमध्ये कंडोम सक्तीचे करण्यात आले होते. १९२७ ते १९३१ या कालावधीत आर्मीला कंडोमचे वाटप अधिकृतपणे केले गेले होतेएचआयव्ही सारखे आजार पसरू नयेत, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती.



5) म्युझिकल थिएटरमध्ये देखील कंडोमचा वापर केला जायचा. 'कॅट्स' या कंपनीनं एका म्युझकल शोमध्ये कलाकारांच्या माईकसाठी कंडोम वापरले होतेपरफॉर्म करताना कलाकारांचा घाम माईकवर पडू नये, यासाठी कंडोमचा वापर केला जायचा१९९७ पर्यंत त्यांनी जवळपास ४९ हजार कंडोमचा वापर अशा टेक्निकल कारणांसाठी केला होता.



6) दुसऱ्या महायुद्धादरम्यान सैनिक कंडोमचा वापर दारू-गोळा किंवा बंदुका लपवण्यासाठी करायचे. पाण्यातून दुसऱ्या जागी जाताना दारू-गोळा आणि बंदुका ओल्या होऊ नयेत, म्हणून त्या कंडोममध्ये लपवल्या जायच्या

7) चार्ल्स गुडयर यांनी १८५५ साली रबरच्या कंडोमची निर्मिती केली. तेव्हापासून रबरच्या कंडोमचा वापर केला जाऊ लागला. 



8) सुरक्षितता आणि कंडोम वापरण्याच्या बाबतीत स्त्रियाही पुरुषांइतक्याच जागरुक आहेत. जगात कंडोमच्या एकूण विक्रीमध्ये जवळपास ५० टक्के कंडोम खरेदी महिलांनी केली आहे.

9) चाळीसपेक्षा जास्त वय असणाऱ्या जोडप्यांमध्ये कंडोम वापरण्याबद्दल कमालीची उदासीनता दिसून येते. वय वाढत गेल्यावर बऱ्याचदा जोडपे कंडोम वापरत नाहीत. यामागेही बरेच गैरसमज आहेत. सरारसरी २५ टक्के जोडपे कंडोमचा नियमित वापर करतात.



10) व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जगभरात सर्वात जास्त कंडोमची विक्री होते. याची सरासरी तब्बल ८७ कंडोम प्रति सेकंद इतकी असते!

11) कंडोम वापरल्यानं तुमच्या लैंगिक सुखात बाधा येत नाही. नॅशनल सर्वे ऑफ सॅक्शुअल हेल्थ अॅण्ड बिहेविअर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हे सिद्ध झालं आहे.



हेही वाचा

...'ती' कंडोम घ्यायला का कचरते?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा