...'ती' कंडोम घ्यायला का कचरते?

 Mumbai
...'ती' कंडोम घ्यायला का कचरते?

एक्सक्युज मी...कंडोम देता का?...असं एखाद्या मुलीनं मेडिकल स्टोअरमध्ये विचारलं की, बाकीच्यांच्या नजरा त्या मुलीकडे वळतात. जणूकाही तिने काहीतरी भलतंच मागितलं की काय? तसं पाहिलं तर स्वत: पुढाकार घेऊन कंडोम विकत घेणाऱ्या महिला अगदी बोटांवर मोजण्याइतक्या आहेत. बरेच पुरुष आपल्या पॉकेटमध्ये कंडोम ठेवतात. पण महिला आपल्या पर्समध्ये कंडोम ठेवायला लाजतात. तुम्ही कधी तुमच्या मैत्रिणीकडून किंवा कोणत्या महिलेकडून ऐकलंय का? की ती पुरुषांसारखी तिच्या पर्समध्ये कंडोम घेऊन फिरते. नाही ना! मग अशा वेळी मेडिकलमध्येच जाणं भाग पडतं. पण मेडिकलमधून कंडोम मागताना हा सो कॉल्ड समाज आपल्याबद्दल काय विचार करेल? हाच विचार करून कित्येक महिला कंडोम विकत घ्यायला लाजतात. काही महिलांना याबद्दल विचारलं तेव्हा काहींनी तर अगं तू काय विचारतेस? महिला कशा जाणार कंडोम मागायला? कसं वाटतं? कंडोम घेताना कोणी बघितलं तर काय बोलतील? असे अनेक उलट प्रश्न विचारले.

"मी एकदा कंडोम घेण्यासाठी गेले होते. पण कसं मागायचं? या विवंचनेत मी होते. शेवटी कंडोम न घेताच मी स्टोअरमधून बाहेर आले,” असं माझ्याच एका मैत्रिणीने सांगितल. तर काही महिलांनी त्यांना कंडोम खरेदी करायला काहीच लाज वाटत नसल्याचं सांगितलं. ते आपल्या आरोग्यासाठी आहे. मग ते मागायला लाज कसली? असं काही महिलांनी स्पष्ट केलं. "माझ्या मिस्टरांना कंडोमचा वापर करायला आवडत नाही. त्यामुळे ते कंडोम विकत घ्यायला टाळाटाळ करतात. पण माझ्या आरोग्यासाठी मी स्वत: कंडोम विकत घेते," असं एका महिलेने सांगितलं.

सेफ सेक्स करण्यासाठी आणि नको असलेली प्रेग्नन्सी दूर ठेवण्यासाठी कंडोम वापरला जातो. मात्र, हाच कंडोम खरेदी करताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीला तुम्हालाही सामोरं जावं लागलं असेल. मात्र, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.  कारण एड्स हेल्थकेअर फाऊंडेशन(एचएफ)ने यावर एक अफलातून मार्ग काढला आहे.  'अ ग्लोबल चॅरेटी' या संस्थेनं भारतात बुधवारी 'फ्री कंडोम' स्टोअर सुरू केलं आहे. या माध्यमातून आता तुम्हाला कंडोम थेट घरपोच मिळू शकेयासाठी तुम्हाला फक्त एक फोन किंवा इमेल करावा लागणार आहेतुम्ही1800-102-8102 या नंबरवर किंवा FreeCondomStoreahf@gmail.comया इमेल आयडीवर कंडोमची ऑर्डर देऊ शकता.

एड्स हेल्थकेअर फाऊंडेशन(एचएफ)ने ट्विटरवर सुरू केलेल्या या #FreeCondomStore हॅशटॅगला नेटीझन्सचाही चांगला प्रतिसाद मिळत आहेएचएफने सुरू केलेल्या मोहिमेचे काही जणांनी स्वागत केले आहेयासोबतच एड्स हेल्थकेअर फाऊंडेशन(एचएफ)ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातला एक व्हिडिओही शेअर केला आहे.

फक्त महिलाच नाही तर पुरुषही कंडोम घ्यायला लाजतातसर्वांसमोर कसं काय मागणारस्टोअरमध्ये महिलाही असतात. त्यांच्यासमोर कसं मागायचंअसे अनेक प्रश्न पुरुषांनाही पडतातप्रत्येकाची कारणं नक्कीच वेगळी असतीलपण याचं मुख्य कारण म्हणजे कुटुंबांमध्ये लैंगिक शिक्षणावर न होणारा संवाद आणि दुसरं कारण म्हणजे समाजतुम्ही कंडोम घ्यायला गेलात की तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातंलगेच तिच्या किंवा त्याच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. पण अशा बाबतीत समाज काय म्हणेल यापेक्षाही आपलं आरोग्य अधिक महत्त्वाचं असायला हवं. आणि आरोग्यासाठी न कचरता कंडोम विकत घेतले पाहिजेत. अगदी महिलांनीही!

Loading Comments