मुंबईतल्या या पार्टीजमध्ये घ्या होळीची मजा!

होळी म्हणजे रंगांचा सण...भारतात वेगवेगळ्य भागात फाल्गुन पौर्णिमेला मोठ्या उत्साहात आणि आनंदात होळी साजरी केली जाते. या उत्सवाला होलिकादहन, होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपर्यंत या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

मुंबईत देखील होळी जोरात असते. एकत्र जमायचं, रंग लावायचे, धमाल करायची हे होळीचं समीकरण. पण या सणालाही आता इव्हेंटचं स्वरूप येऊ लागलं आहे. अनेक रिसॉर्ट्समध्ये या निमित्तानं कलाकारांचे परफॉर्मन्सेस, गेम्स, खाण्याची रेलचेल अशी पॅकेज तयार केली जातात. होळीच्या दिवशी दुपारी बीचवर पोहोचायचं. तंबूत मस्तपैकी राहाण्याची व्यवस्था. संध्याकाळी गेम्स, चहा-कॉफी, रात्री होळी त्याचबरोबर कॅम्पफायर, बार्बेक्यू, म्युझिक. दुसऱ्या दिवशी बीचवरच नाश्ता आणि मग रंगपंचमी. सगळा कार्यक्रम व्यवस्थित आखलेला असतो.

आम्ही तुम्हाला अशाच काही होळी पार्टी संदर्भात माहिती देणार आहोत. जिथे तुम्ही कुटुंबियांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत मनसोक्त होळी आणि रंगपंचमीचा आनंद घेऊ शकता.

१) चिकू फार्म

'स्मॉल स्टेप्स अॅडव्हेंचर'तर्फे डहाणूतल्या चिकू फार्ममध्ये होळी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. तुम्हाला जर वेगळ्या प्रकारे होळी खेळायची असेल, तर तुमच्यासाठी हा पर्याय योग्य आहे. होळीशिवाय तुम्हाला या इव्हेंटला कम्पेनिंग, लाइव्ह डीजे परफॉर्मन्स आणि बॉनफायर अशा गोष्टींचा आनंद घेता येईल.

कधी - १ आणि २ मार्च

कुठे - डहाणू चिकू फार्म, रामपूर पोस्ट घोलवड, डहाणू

किंमत - २,५०० (मोठ्यांसाठी) आणि १५०० (लहानांसाठी)

२) सनराईज टू सनसेट फेस्टिव्हल

इकोफ्रेंडली होळी खेळायची असेल, तर तुम्ही सनराईज टू सनसेट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ शकता. तुमच्यात दडलेल्या लहान मुलाला बाहेर काढा आणि क्षणांचा आनंद घ्या. रंगपंचमीत इकोफ्रेंडली हर्बल कलर्स वापरण्यात येणार आहेत. याशिवाय डीजे आणि काही कलाकार परफॉर्म करणार आहेत.

कधी - २ मार्च

कुठे - कळंब बीच, नालासोपारा

किंमत – १५०० (एकासाठी), २५०० (कपल्ससाठी)

३) पूल पार्टी

बीचवर होळी साजरी करण्याची मजा काही औरच...तुम्हाला सुद्धा जर बीचवर होळीची मजा लुटायची असेल, तर तुमच्यासाठी हा पर्याय अगदी योग्य आहे. जुहू बीच इथं होळी पूल पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. डान्स, म्युझिक, कलर्स, खाणं-पिणं याची सोय पूल पार्टीमध्ये करण्यात आली आहे.

कुठे - २ मार्चला ८ वाजल्यानंतर

कुठे - जुहू बीच

किंमत - १५०० (कपल्ससाठी), १००० (एकट्यासाठी)

संपर्क - ८८९८६८१६०६

४) डान्स, म्युझिक आणि फुल टू धमाल

एस्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंगडममध्ये देखील धूम धडाक्यात होळी खेळली जाते. पण इथल्या होळीत रंगांचा वापर केला जात नाही. तीन दिवस चालणाऱ्या या होळी पार्टीत म्युझिक, राईड्स अशी धमाल असते.

कधी - २ ते ४ मार्च

कुठे - वॉटर किंगडम, ग्लोबल पगोडा रोड, गोराई व्हिलेज, बोरिवली

एस्सेल वर्ल्ड, ग्लोबल पगोडा रोड, गोराई व्हिलेज, बोरीवली

किंमत - ४८६ रुपये आणि ६९० रुपये

तिकीट बुक करण्यासाठी - https://in.bookmyshow.com/mumbai/events/holi-bash-2018/ET00070586

५) रंग मोहल्ला २०१८

मुंबईतली सर्वात चर्चित अशी होळी पार्टी म्हणजे रंग मोहल्ला २०१८. गेल्यावर्षी म्हणजेच २०१७ साली रंग मोहल्ला या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षी देखील मुंबईत या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळेल असा आयोजकांचा दावा आहे. बॉलिवूड सेलिब्रिटिज, डीजे, लाइव्ह ढोल, व्हिलेज थीम सेटअप, रेन डान्स, फुड, ड्रिंक्स आणि स्पेशल कलर्स अशी मजा रंग मोहल्ला या इव्हेंटला घेता येणार आहे.

कधी - २ मार्चला सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत

कुठे - दत्ता क्रिडा प्रबोधिनी ग्राऊंड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड


हेही वाचा

डायबेटिस असूनही तुम्ही गोड खाऊ शकता! हे वाचा!

पुढील बातमी
इतर बातम्या