आता मुंबईकरांना अलिबागमध्ये बालीसारखा अनुभव घेता येणार

मुंबईजवळील अलिबाग येथे बालीबाग हे बाली स्टाईल रिसॉर्ट लवकरच सुरू होणार आहे. हे अलिबागच्या निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे, ज्याला ‘मिनी गोवा’ म्हणूनही ओळखले जाते. मुंबईपासून फक्त दोन ते तीन तासांच्या अंतरावर आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ९० मिनिटांच्या अंतरावर असेल.

बालीबागची रचना, बालीची मंदिरे आणि राजवाड्याच्या वास्तुकलेतून प्रेरणा घेऊन केली जाईल. या रिसॉर्टमध्ये 2 आणि 3 BHK लक्झरी व्हिला ज्यामध्ये खाजगी पूल आणि गार्डन्स, ओपन शॉवर, टेरेस जकूझी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंटिरियर्स, स्लोपिंग रूफ्स, डेकोरेटिव्ह क्राउन्स अशा बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेता येईल. 

याव्यतिरिक्त, रिसॉर्टमध्ये 3 रेस्टॉरंट्स, स्पा, बँक्वेट हॉल, पार्टी लॉन, जिम इत्यादी 20 पेक्षा जास्त सुविधा असतील. रिसॉर्टमध्ये वाय-फाय सुविधा आणि जनरेशन व्यतिरिक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम, ईव्ही चार्जिंग स्टेशन यासारख्या पर्यावरण पुरक पद्धतींचा वापर केला जाईल.

हॉलिडे होमच्या धर्तीवर बालीबागचा विकास करण्यात येत आहे. कंपनीने सर्वोत्कृष्ट श्रेणीतील हॉटेल सेवा आणि भाडे कार्यक्रमासोबत भागीदारी केली आहे जी तुम्हाला दरवर्षी 28 रात्री मुक्कामाची ऑफर देते, आंतरराष्ट्रीय रिसॉर्ट मानकांनुसार जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेऊ शकता.

अलिबाग हे एक लोकप्रिय सुट्टीचे आणि पर्यटन स्थळ आहे जे मुंबईच्या दक्षिणेस 100 किमी अंतरावर आहे, रस्ते आणि समुद्राने  जोडलेले आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी, क्रिकेटपटू, उद्योगपती आणि एचएनआय यांचे हे दुसरे घर आहे. येथे ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि पर्यटकांना भेट देण्यासारखी ठिकाणे देखील आहेत. अलिबाग हे अवकाश आणि गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून उदयास येत आहे. नामांकित विकासक त्यांच्या लक्झरी प्रकल्पांसाठी स्थानावर लक्ष ठेवून आहेत आणि मोठे हॉस्पिटॅलिटी ग्रुप्स येथे रिसॉर्ट्स आणि हॉटेल्सची योजना करत आहेत.

अलिबाग नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांसह वेगाने विकसित होत आहे ज्यामुळे  प्रवासाचा वेळ आणखी कमी होईल. यामध्ये अलिबागमध्ये नियोजित आणखी 12 जेटी, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे 6 लेनिंग, विरार ते अलिबागपर्यंत 12 लेन मल्टी नोडल कॉरिडॉर, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक यांचा समावेश आहे, ज्यामुळे मुंबई आणि आगामी नवी मुंबई विमानतळापासून प्रवासाचा वेळ 2 तासांपर्यंत कमी होईल.


हेही वाचा

मुंबई-ठाणेकरांना अनोखी मेजवानी! अनुभवा ‘स्काय डायनिंग’चे अॅडव्हेंचर

पुढील बातमी
इतर बातम्या