Advertisement

मुंबई-ठाणेकरांना अनोखी मेजवानी! अनुभवा ‘स्काय डायनिंग’चे अॅडव्हेंचर

आता तुम्ही जमिनीपासून 120 फूट उंचीवर जेवणाचा आनंद लुटू शकता.

मुंबई-ठाणेकरांना अनोखी मेजवानी! अनुभवा ‘स्काय डायनिंग’चे अॅडव्हेंचर
SHARES

बरं स्काय डायविंगचा आनंद आतापर्यंत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल. पण तुम्ही कधी 120 फूट उंचीवर जेवणाचा आनंद घेतला आहे का? नाही ना... मग आता तुम्ही जमिनीपासून 120 फूट उंचीवर जेवणाचा आनंद लुटू शकता.

बंगळूर, गोवा, पुण्यापाठोपाठ मुंबई-ठाणे परिसरात प्रथमच स्काय डायनिंग रेस्टॉरंट सुरू झाले आहे. मुंबई-ठाणे परिसरातील हे पहिले स्काय डायनिंग रेस्टॉरंट आहे. अंजुर येथील सया ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये सुरू झालेल्या या तरंगत्या उपाहारगृहाचे उद्धाटन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

समोर निळाभोर आकाश, सुसाट हवा, डोळ्यांचे पारणे फिटतील असा निसर्गाचा नजारा सोबतीला तुमच्या आवडिच्या चमचमित पदार्थांची मेजवानी... आहाहा... अनेक जण याची कल्पना करूनही मोकळे झाले असतील. कल्पना करूनच कसलं भारी वाटतंय. मग विचार करा की, प्रत्यक्षात अनुभवाल तर किती मज्जा येईल.

भिवंडी तालुक्यातील अंजुर इथल्या सया ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये हवेत तरंगणारे रेस्टॉरंट सुरू झालं आहे. या रेस्टॉरंटमुळे एकाच वेळी 22 पर्यटकांना चांदणं आणि आकाशाच्या सान्निध्यात जेवण्याची, सेलिब्रेशन करण्याची संधी उपलब्ध होत आहे.

डायनिंग टेबलच्या सीट अशाप्रकारे डिझाईन केल्या आहेत की, तुम्हाला 360 अंशातून आजूबाजूचा परिसर पाहता येईल. या स्काय डायनिंगच्या सीट पूर्णत: सुरक्षित आहेत.

फक्त जेवणाचाच नाही तर लाईव्ह म्युझिकचाही आनंद घेऊ शकता. हवेत तरंगणाऱ्या डायनिंग टेबलच्या मध्यभागी म्युझिशियनचा बँड तुमचे मनोरंजन करेल.

चमचमत्या चांदण्याच्या, आकाशाच्या सानिध्यात मेजवानीचा आस्वाद घेण्याचे तुमचे स्वप्न असेल तर ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा