ऑक्सफर्ड डिक्शनरीत मोठे बदल, लिंगभेद करणारे शब्द टाळणार

जगभरातील सर्वात महत्त्वाची डिक्शनरी असलेली ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. मारिया बेट्रिस जियोनावार्डी यांनी २०१९ साली लिंगभेदाविरोधात आवाज उठवला होता. 

याचिकाकर्त्या मारिया बेट्रिस जियोनावार्डी यांनी डिक्शनरीमध्ये होत असलेल्या स्त्री पुरुष भेदभावाविरोधात ऑनलाइन मोहीम सुरु केली होती. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये देण्यात आलेली उदाहरणं स्त्री-पुरुष भेदभावाचं सर्वांत मोठं उदाहरण आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

त्यांनी याचिकेत म्हटलं होतं की, नर्स किंवा सेक्रेटरीची भूमिका ही केवळ महिलांची दाखवली जाते. त्यामुळे या भूमिका केवळ महिलांच्याच आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतो. पण प्रत्यक्षात नर्स आणि सेक्रेटरीचं काम पुरुषही करतात.

घरकामासंबंधी देखील महिलांचीच उदाहरणे दिली जातात. यामध्ये जवळपास ३० हजार नागरिकांनी सह्या केल्या. त्यामुळे ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये अनेक शब्दांची परिभाषा बदलण्यात आली आहे.

ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनमध्ये आलेल्या माहितीनुसार, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे की, मॅन, हाऊसवाईफ आणि हाय मेंटेनन्स सारख्या शब्दांचे अर्थ बदलले गेले आहेत. यामध्ये महिलांच्या कामाचा आवाकादेखील वाढवण्यात आला आहे.

त्याचबरोबर ट्रान्स जेंडर्सनाही डिक्शनरीत स्थान देण्यात आलं आहे. याआधी महिलांना पुरूषांची प्रेमिका किंवा पत्नी दाखवण्यात यायचं. परंतु आता पुरुषाच्या जागी पर्सन हा शब्द वापरण्यात येणार आहे.

सर्च इंजिन गुगलवर देखील लैंगिक भेदभाव करण्याचे आरोप लागले आहेत. बिच शब्द टाकल्यानंतर गुगलवर आसपासच्या जवळच्या गर्ल्स हॉस्टेलचा पत्ता दिसत असे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

त्याचबरोबर नर्स किंवा सेक्रेटरीची भूमिका ही केवळ महिलांची दाखवली जाते. तसंच ताकदवर कामेही पुरुषाची दाखवली जातात. गुगलनं या आरोपांबाबत कधीही स्पष्टीकरण दिले नाही. पण काही बदल केले.


हेही वाचा

बिग बास्केटच्या २ कोटी ग्राहकांचा डेटा लिक

लॉकडाऊनमध्ये बिअरच्या विक्रित मोठी घट, 'हे' आहे कारण

पुढील बातमी
इतर बातम्या