Advertisement

लॉकडाऊनमध्ये बिअरच्या विक्रित मोठी घट, 'हे' आहे कारण

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यानुसार, कोरोना काळात महाराष्ट्रातील बिअरच्या विक्रित घट झाली आहे.

लॉकडाऊनमध्ये बिअरच्या विक्रित मोठी घट, 'हे' आहे कारण
SHARES

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यानुसार, कोरोना काळात महाराष्ट्रातील बिअरच्या विक्रित घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये बिअरची विक्रि ६२.५ टक्क्यांनी घटली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, ऑक्टोबरमध्ये बिअरची विक्री दररोज ३ लाख लिटर होती. ती यावर्षी जानेवारीत ८ लाख लिटर होती.

खरेदीवरील निर्बंध हटवताना बिअरची विक्री गगनाला भिडण्याची अपेक्षा आहे. असं असलं तरी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, COVID 19 मुळे देशभर बिअरसारख्या थंडगार उत्पादनांबद्दल लोक संशयी आहेत.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप म्हणाले की, “COVID 19 मुळे लोकांना थंड प्रोडक्ट न खाण्यास सांगितलं जातं. बिअर थंड असल्यानं त्याच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.”

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, याच कालावधीत इतर मद्य विक्रीवर फारसा परिणाम झाला नाही. COVID 19 लॉकडाउनपूर्वी देशी दारूची विक्री दररोज १० लाख लिटर होत होती. तर सध्या ही आकडेवारी ९ लाख लिटरच्या घरात आहे.

शिवाय, वोडका, रम आणि व्हिस्कीची विक्री दररोज ६ लाख लिटर इतकी होत आहे. ही आकडेवारी कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी इतकीच होती. दारू विक्रीतून एकूण ३५ कोटी रुपये उत्पन्न झाले असून सरासरी आकडेवारी ३८ ते ४० कोटी रुपयांपर्यंत आहे.

असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह रिटेल लिकर विक्रेतेचे अध्यक्ष अरविंद मिसकिन म्हणालं की, “बिअरची विक्री वाईन शॉप्समध्ये सर्वाधिक होते. मेमध्ये दारूची दुकाने सुरू झाल्यापासून मागील सहा महिन्यांत विक्रीत घट झाली आहे. COVID 19 च्या लक्षणांपैकी एक सर्दीची समस्या आहे. त्यामुळे ग्राहक थंडगार बिअर पिऊन सर्दी होण्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत.”

राज्यात दारू विक्रीतून उत्पादन शुल्क म्हणून राज्य सरकार हजारो कोटींची निर्मिती करते. मार्चमध्ये COVID 19 लॉकडाऊन दरम्यान राज्यात दारू विक्रीवर बंदी घातली गेली होती. पण सरकारनं दारूची दुकानं मेमध्ये पुन्हा सुरू केली.

दारूची दुकानं सुरू होताच खरेदीसाठी गर्दी वाढली आणि सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळला गेला नाही. १ एप्रिल ते २३ ऑक्टोबर २०२० या कालावधीत सरकारनं अबकारी शुल्क स्वरूपात ६ हजार ०२४  कोटी रुपये जमा केले आहेत.हेही वाचा

मेट्रो कारशेडचं काम थांबवा, केंद्राने सांगितला जागेवर हक्क

कोरोनासंबंधी सुरक्षेचे उपाय करण्यात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वोत्तम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement