Advertisement

कोरोनासंबंधी सुरक्षेचे उपाय करण्यात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वोत्तम

आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषद अर्थात एसीआयशी संलग्न असलेल्या विमानतळांमधून मुंबईच्या विमानतळाला हा सन्मान मिळाला आहे.

कोरोनासंबंधी सुरक्षेचे उपाय करण्यात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वोत्तम
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिकेसह राज्य सरकारनं गर्दी न करण्याचं आवाहन मुंबईकरांना केलं. त्यासोबतच स्वच्छता राखण्याचं ही आवाहन केलं होतं. त्यानुसार मुंबईच्या अनेक ठिकाणी स्वच्छता ठेवली जात असून कोरोनासंबंधी सुरक्षेचे उपाय करण्यात मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (mumbai airport) सर्वोत्तम ठरले आहे. 

आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषद अर्थात एसीआयशी संलग्न असलेल्या विमानतळांमधून मुंबईच्या विमानतळाला हा सन्मान मिळाला आहे. कोरोना लॉकडाऊनची प्रक्रिया पुन्हा सुरू होताना २५ मेपासून उड्डाणे सुरू झाली. परंतु ही उड्डाणे सुरू करण्यासाठी कोरोनासंबंधी विविध नियम व सुरक्षेचे उपाय अत्यावश्यक होते. त्यामध्ये मुंबईच्या विमानतळाने चोख उपाय केल्याची माहिती समोर येत आहे. 

यासंबंधी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडनेदेखील प्रवाशांकडे तशी विचारणा केली होती. ८४.२० टक्के प्रवाशांनी विमानतळाला सुरक्षेसंबंधी सर्वोत्तम गुण दिल्याचं समजतं.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, राज्यात सोमवारी कोरोनाने १०४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत सोमवारी दिवसभरात ७०६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सोमवारी दिवसभरात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा