या ट्रिक्स वापरून करा तुमच्या कॅमेऱ्याची लेन्स क्लिन

फोटो ही स्मृती जपून ठेवणारी अजरामर कला आहे. सध्या अनेकांनी फोटोचा छंद जोपासला आहे. डिएसएलआर नसला तरी त्याच्या तोडीस तोड असा मोबाईल कॅमेरा आहेच. लहानग्यांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत अनेकांना या फोटोच्या छंदानं वेड लावलं आहे.

कधीकाळी फक्त कॉलिंगसाठी मोबाईलचा वापर व्हायचा. पण जसजसा काळ बदलत गेला तसं मोबाईलमध्ये वेगवेगळे फिचर्स समाविष्ट होत गेले. मोबाईलचा स्मार्टफोन झाला आणि आता कॅमेरा. फोटोसाठी खास करून अधिकाधिक मेगापिक्सलचा कॅमेरा मोबाईलमध्ये दिला जातो. जेणेकरून प्रत्येक आनंदी क्षण या छोट्याशा मोबाईलमध्ये टिपता यावेत.

मात्र स्मार्टफोनच्या कॅमेराची एक समस्या असते ती म्हणजे जसजसा मोबाईल जुना होतो तसतसा त्याचा परिणाम त्याच्या कॅमेरावरदेखील दिसू लागतो. फोटो धुरकट येणे, कॅमेऱ्याच्या लेन्सवर धूळ जमा होणे अशा अनेक गोष्टी होतात. पण वेळोवेळी कॅमेरा साफ केला तर या समस्या निर्माण होणारच नाहीत. मग आम्ही दिलेल्या टिप्स अमलात आणा आणि लेन्सला चकाकी आणा.

१) थोडीशी टूथपेस्ट घेऊन कॅमेऱ्याच्या लेन्सवर लावा. त्यानंतर थोडासा कापूस घेऊन त्यानं साफ करून घ्या. कापसानं साफ करून झाल्यावर त्यावर एक थेंब पाणी टाकून कॉटनच्या फडक्यानं साफ करून घ्या.

२) खोडरबर प्रत्येकाच्या घरी असतो. हा खोडरबर घ्यायचा आणि एकाच दिशेनं जवळपास २-३ मिनिटं कॅमेऱ्याच्या लेन्सवर फिरवायचा. यामुळे कॅमेऱ्याच्या लेन्सवरील घाण साफ होते.

३) पाण्याच्या २० थेंबांमध्ये रबिंग अल्कोहोलचा एक थेंब टाका आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण मायक्रोफायबर क्लॉथवर लावून कॅमेऱ्याची लेन्स नीट स्वच्छ करा. कमीत कमी ५ वेळा तुम्ही प्रक्रिया करा.

४) व्हॅसलिनचा वापर करून देखील स्मार्टफोनचा कॅमेरा स्वच्छ करता येतो. थोडसं व्हॅसलिन कॅमेऱ्याच्या लेन्सवर चोळा आणि मायक्रोफायबर क्लॉथनं पुसून घ्या.

५) अनेकदा स्मार्टफोनच्या लेन्सवर स्क्रेचेस पडतात. यावर उपाय म्हणजे स्क्रेच रिमूव्हर. बाजारात सहज उपलब्ध असणाऱ्या या स्क्रेच रिमूव्हरनं स्क्रेचेस निघून जातील.


हेही वाचा

'असा' ओळखा तुमच्या आधार कार्डचा गैरवापर


पुढील बातमी
इतर बातम्या