Advertisement

'असा' ओळखा तुमच्या आधार कार्डचा गैरवापर

आधार ऑथोरटीकडून UIDAI च्या वेबसाईटवर एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तुमच्या आधार कार्डचा कुणी गैरवापर तर करत नाही ना? याबाबत तुम्हाला तात्काळ माहिती मिळेल आणि तुम्ही त्याविषयी तक्रार नोंदवू शकता.

'असा' ओळखा तुमच्या आधार कार्डचा गैरवापर
SHARES

तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? नक्कीच असेल. कारण आता सिमकार्ड घ्यायचं असो, बँकेत खातं उघडायचं असो वा आयटी रिटर्न्स भरायचे असो, सगळीकरे आधार कार्ड लागतंंच. आपल्या सर्व सेवा आणि योजनांना आपल्या आधार कार्डशी लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे अर्थात ते सर्वांचाकडे असेलच.


डेटा चोरीची चर्चा

मात्र आधार कार्ड वापरणाऱ्यांनी काही गोष्टींबाबत सतर्क राहणे देखील आवश्यक आहे. कारण मध्यंतरी आधार कार्डचा डेटा चोरीला गेल्याची किंवा बनावट आधारकार्ड बनवून त्याचा वापर करण्यात येत असल्याची चर्चा जोरदार होती. यामुळे लोकांमध्ये चिंतेचं वाचावरण होतं. पण आता आधार ऑथोरटीकडून UIDAI च्या वेबसाईटवर एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तुमच्या आधार कार्डचा कुणी गैरवापर तर करत नाही ना? याबाबत तुम्हाला तात्काळ माहिती मिळेल आणि तुम्ही त्याविषयी तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्हाला दिलेल्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

१) सर्वात पहिलं UIDAI च्या वेबसाईटवर जा. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री (Aadhar Authentication History) यावर क्लिक करायचे आहे.

२) OTP जनरेट करण्यासाठी एक पेज ओपन होईल. त्यामध्ये Enter UID आणि Enter Security Code हे दोन पर्याय तुम्हाला दिसतील. Enter UID मध्ये तुम्हाला तुमचा १२ आकड्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. Enter Security Code मध्ये कोड टाका. त्यानंतर जनरेट ओटीपी या बॉक्सवर क्लिक करा. असा तुमचा ओटीपी तयार होईल.

३) त्यानंतर तुमच्या समोर आधार नोटीफिकेशन सेटिंग (Aadhar Notification setting) हे पेज ओपन होईल. पहिला ऑपशन येईल तो ऑथेंटिकेशन टाईपचा (Authentication type). ऑथेंटिकेशन टाईपमध्ये तुम्हाला OTP हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्ही आधार कार्ड बनवल्यापासून ते आतापर्यंतची डेट टाकू शकता. त्यानंतर Number Of Recordes मध्ये किती रेकॉर्ड हवेत तुम्हाला हे वाचू शकता. ५० रेकॉर्डची मर्यादा यात असते. त्यानंतर तुम्हाला मिळालेला OTP टाकायचा आहे आणि सबमिट करायचं.

४) सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड कुठं आणि कशासाठी वापरण्यात आल्याची सर्व माहिती समोर येईल.

५) समोर आलेल्या माहितीमध्ये काही गडबड असल्याचं जाणवलं तर UIDAI च्या १९४७ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

६) सर्वात महत्त्वाचं तुमचं आधार कार्ड वापरण्यासाठी UIDAI कडून परवानगी घ्यावी लागते. तरच UIDAI तुमचा डेटा शेअर करतो.



हेही वाचा-

गुगलसंदर्भात जाणून घ्या या ९ गोष्टी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा