Advertisement

गुगलसंदर्भात जाणून घ्या या ९ गोष्टी

जगभरातील माहिती लोकांना पुरवणाऱ्या गुगलसंदर्भात काही गोपनीय माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. गुगल वापरणाऱ्या प्रत्येकाला ही माहिती असायलाच हवी.

गुगलसंदर्भात जाणून घ्या या ९ गोष्टी
SHARES

आपल्यापैकी सर्वच गुगलचा वापर करतात. गुगल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. जिसका कोई नही होता उसका गुगल होता है, या वाक्यप्रचाराचा वापर आपण अनेकदा मस्करी म्हणूनही केला असेल. गुगलनं सर्च इंजिनच्या क्षेत्रात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हे स्थान गुगलकडून दुसरं कुठलंच सर्च इंजिन हिरावून घेऊ शकत नाही

गुगलला सर्वांबद्दल सर्व काही माहिती असतं. पण गुगल संदर्भातल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहित नसेल. जगभरातील माहिती लोकांना पुरवणाऱ्या गुगलसंदर्भात काही गोपनीय माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. गुगल वापरणाऱ्या प्रत्येकाला ही माहिती असायलाच हवी

) लॅरी आणि सर्गी या दोघांनी गुगलची स्थापना केली. पण १९९८ साली मायक्रोसिस्टीम कंपनीचे सहसंस्थापक अँडी बॅचतोलशॅयम यांनी दोन्ही मित्रांना एक लाख डॉलर रक्कम दिली. या मदतीमुळे लॅरी आणि सर्गी यांना गुगल कंपनी सुरू करता आली.


) लॅरी आणि सर्गी यांनी इंटरनेटवर सर्च इंजिन तयार केले. पहिले याचे नाव बॅकरब होते. पण नंतर या कंपनीला गुगल डॉट कॉम डोमेन हे नाव मिळाले.

आय एम फिलिंग लकी हे बटण देण्यासाठी गुगलला दरवर्षी ६८२ अब्जाधिश इतकी रक्कम मोजावी लागते. आय एम फिलिंग लकी यामध्ये जाहिरात न पाहता युजरला सर्च करता येते.


) सौदी अरबच्या वाळवंटामध्ये स्ट्रीट व्ह्यूच्या शूटिंगसाठी गुगलनं भाड्यानं उंट घेऊन त्याच्या पाठीवर कॅमेरे बसवले होते. कठीण मोहीम सहजरीत्या सोपी करण्यासाठी ही मोहीम अवलंबवली होती.



) गुगल कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला पुढील १० वर्ष अर्धा पगार दिला जातो. त्याचबरोबर मुलांना एक हजार डॉलर इतकी रक्कम १९ वर्षांचे होईपर्यंत दिली जाते.

 


) गुगलचे ४० पेक्षा जास्त देशांमध्ये ७० कार्यालयं आहेत.


) २००७ साली गुगलनं अॅपल आयफोनला स्पर्धक म्हणून स्वत:चा मोबाइल फोन काढण्याची योजना आखली. या प्रोजेक्टला अँड्रॉइड नाव देण्यात आले. जे आज मोबाईलचे ऑपरेटिंग सिस्टिम म्हणून ओळखले जाते.


) गुगलचे डुडल हे सर्वांच्याच पसंतीस उतरते. आतापर्यंत गुगलनं १००० डुडल्स बनवली आहेत. गुगलच्या या टीमला डुडलर्स म्हणून ओळखले जाते.

) २००६ साली गुगलनं १.६५ बिलियन डॉलर्सला युट्यूबला विकत घेतले होते. युट्यूब आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकप्रिय वेबसाईट आहेयुट्यूबवर प्रत्येक मिनिटाला ३०० तासांपेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड होत असतात.  



हेही वाचा

फेसबुकचंही अाता डेटिंग अॅप, टिंडरला देणार टक्कर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा