Advertisement

फेसबुकचंही अाता डेटिंग अॅप, टिंडरला देणार टक्कर


फेसबुकचंही अाता डेटिंग अॅप, टिंडरला देणार टक्कर
SHARES

आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी आता तुम्हाला फेसबुकही मदत करणार आहे. कारण फेसबुक युजर्ससाठी डेटिंग फिचर घेऊन आलं आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया साईट यात नव्यानं उतरणार आहे.


फेसबुकची टिंडरला टक्कर

सध्या टिंडरसारखे डेटिंग अॅप उपलब्ध आहेत. जोडीदार शोधण्यासाठी किंवा डेटिंगसाठी या अॅप्सना मिळणारा प्रतिसाद तुफान आहे. त्यामुळेच फेसबुकनं डेटिंग सेवेत उतरण्याचा निर्णय घेतलाय. फेसबुकच्या सर्वेक्षणानुसार जवळपास २ अब्ज युजर्स हे एकटे आहेततेव्हा त्यांच्यासाठी फेसबुकनं हे फिचर आणलं आहे



फेसबुक डेटिंगचं वेगळं अकाऊंट

युजर्सच्या फेसबुक अकाऊंटहून फेसबुक डेटिंगचं अकाऊंट हे वेगळं असणार आहे. डेटिंगसाठी तुम्हाला वेगळं प्रोफाईल बनवावं लागेल. फेसबुक अकाऊंटवर असलेल्या युजर्सना आपला मित्र किंवा मैत्रिण हे डेटिंग अॅप वापरत आहेत याबद्दल कुठलीही माहिती मिळणार नाही. चॅट करण्यासाठी वेगळी मेसेजिंग सर्विस असणार आहे. पण मेसेजिंग सर्विसवर फोटो शेअरिंग करता येणार नाही. जर तुम्ही डेटिंग चॅटचा वापर करत असाल तर तुम्हाला अनेक ग्रुप्स आणि इव्हेंटला अनलॉक करावं लागेल. सध्या डेटिंग सेवा पुरवणाऱ्या अॅपमध्ये टिंडर आघाडीवर आहे. त्यामुळे टिंडर फेसबुकसाठी मोठा प्रतिस्पर्धी ठरतो की नाही हे येणारा काळच ठरवेल.



हेही वाचा

ऑनलाईन डेटिंग करताय? मग या ७ गोष्टी लक्षात ठेवा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा