Advertisement

आता गुगल देणार भारतातील पूरस्थितीची माहिती

या गुगलच्या सहाय्याने युजर्सला मुंबईसह देशात पाणी कुठं तुंबलं, किंवा काही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

आता गुगल देणार भारतातील पूरस्थितीची माहिती
SHARES

आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असल्यास आपण थेट गुगलवर जाऊन सर्च करतो. विशेष म्हणजे हवी असलेली प्रत्येक माहिती आपल्याला मिळतेसुद्धा. अशा या गुगलच्या सहाय्याने युजर्सला मुंबईसह देशात पाणी कुठं तुंबलं, किंवा काही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.


नितीन गडकरींनी केलं ट्वीट

सोमवारी, १८ जून २०१८ रोजी जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत गुगल या आयटी कंपनीसोबत सांमजस्य करार झाला असून या करारमध्ये गुगलच्या मदतीने भारतात पाण्याची पातळी आणि पूर व्यवस्थापन या विषयी थेट आणि अचूक माहिती मिळणार आहे. नुकतंच नितीन गडकरी यांनी याबाबत ट्वीटही केलं आहे.


 

भारतातील सर्व नेटवर्क क्षेत्रासोबत चांगले संबंध असल्यानं गुगलला ही माहिती मिळवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तसंच याआधी चेन्नईतील पूर किंवा मणिपूरमध्ये झालेल्या भूकंपादरम्यान गुगल आणि फेसबुकने अशाच प्रकारचं काम केलं होतं.


ही माहिती होणार प्राप्त

गुगलच्या या कराराचा फायदा असा की यामुळे भारतातील नद्यांची पातळीची रिअल टाइम माहिती प्राप्त होणार आहे. तसंच गुगल नाऊ कार्ड, गुगल अॅप, गुगल मॅप, तसंच गुगल पब्लिक अलर्ट होम पेज याद्वारे युजर्सला माहिती मिळू शकणार आहे. त्याशिवाय जर एखादा व्यक्त पूरस्थितीत अडकला असेल त्याची माहितीही इतरांना मिळू शकणार आहे. तसंच गुगल यासाठी काही नवीन चिन्हही तयार करणार असून त्याद्वारे पूरसदृश्य परिस्थितीत अडकलेला व्यक्ती सुरक्षित आहे की नाही याबद्दल आपल्याला समजणार आहे.


हेही वाचा - 

‘नेबर्ली’ अ‍ॅपवर बनवा नवीन शेजारी

इंग्रजी शब्दांचे मराठीतून अर्थ हवेत, मग डाऊनलोड करा 'हा' ॲप

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा