Advertisement

इंग्रजी शब्दांचे मराठीतून अर्थ हवेत, मग डाऊनलोड करा 'हा' ॲप


इंग्रजी शब्दांचे मराठीतून अर्थ हवेत, मग डाऊनलोड करा 'हा' ॲप
SHARES

विज्ञान आणि तंत्रज्ञानात होत असलेला विकास विचारात घेता, मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा, शिवाय रोजच्या व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ आणि मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाच्या मराठी भाषा विभागाने शासन शब्दकोष हे ॲप तयार केलं आहे. निवडक शब्दांचा समावेश असलेले हे ॲप तयार करण्यासाठी मराठी भाषा संचनालयाची मदत घेण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिनी या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं.


दैनंदिन व्यवहारातील इंग्रजी शब्दांना पर्याय

भाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या शब्दकोशांपैकी शासन व्यवहार कोश, प्रशासन वाक्यप्रयोग, न्यायव्यवहार कोश आणि कार्यदर्शिका हे चार निवडक शब्दकोश पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे.


कसा डाऊनलोड कराल?

या ॲपची रचना अत्यंत सहज आणि सुलभ आहे. यासाठी अँड्रॉईड फोनची गरज आहे. एकदा का हे ॲप डाउनलोड केले की नेटशिवाय कधीही, कोठेही आणि केव्हाही वापरता येणार आहे. यामध्ये आपण आपल्या पसंतीचा शब्दकोश आणि त्यातील इंग्रजी - मराठी आणि मराठी - इंग्रजी शब्दांचे अर्थ सुलभपणे पाहू शकतो. हा भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोअरवरून https://play.google.com/store/apps/details?id=gov.maharashtra.shabdkoshapp या लिंकवरून मोफत स्वरुपात डाउनलोड करता येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा