किकी चॅलेंज स्वीकारण्यापूर्वी 'हे' नक्की वाचा

सध्या सोशल मीडियावर एकच गाणं धुमाकूळ घालत आहे ते म्हणजे किकी डू यू लव्ह मी. गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक आणि इन्स्ट्राग्रामवर हेच व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. पण तरुण-तरुणींमध्ये लोकप्रिय असलेले हे चॅलेंज सध्या मुंबई पोलिसांच्या नाकीनऊ आणत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या चॅलेंजवर बंदी घातली आहे. या संदर्भात पोलिसांनी ट्विटरवर ट्विटदेखील केलं आहे.

कीकी चॅलेंज म्हणजे? 

किकी चॅलेंज सध्या इंटरनेटवर लोकप्रिय ठरत आहे. या चॅलेंजअंतर्गत चालू गाडीमधून खाली उतरून हळूहळू चालवणाऱ्या गाडीच्या दाराजवळ नाचायचे आणि काही अंतर गेल्यावर पुन्हा चालू गाडीत येऊन बसायचे. हे सर्व करताना गाडीच्या फ्रंटसीटवरील व्यक्ती म्हणजेच जी गाडी  चालवत  असेल ती नाचणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ शूट करेल. कॅनेडियन रॅपर डर्कनं गायलेल्या इन माय फिलिंग्स गाण्यातील पहिल्या कडव्यातील चालीवर हा डान्स केला जातो. #kikichallenge हा हॅशटॅग वापरून या चॅलेंजचे व्हिडिओ शेअर केले जात आहेत.

धोकादायक चॅलेंज

किकी चॅलेंजच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालत आहेत. सोशल मीडियावर किकी चॅलेंज करताना दुर्घटनाग्रस्त झाल्याचे व्हिडिओदेखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे जगभरातल्या अनेक शहरांमध्ये या चॅलेंजवर बंदी घालण्यात आली आहे. चालू गाडीतून उतरून गाडीच्या बाजूला नाचत राहणे धोकादायक असल्यानं पोलिसांनी याचा विरोध केला आहे. हे चॅलेंज करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होऊ शकते, असं परिपत्रक पोलिसांनी जाहीर केलं आहे.

चॅलेंजविरोधात पोलिसांची मोहीम

आता पोलिसांनी हे चॅलेंज अधिक व्हायरल होण्याआधीच या चॅलेंजबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं सोशल मीडियावरून कॅम्पेन सुरू केलं आहे. #DanceYourWayToSafety आणि #InMySafetyFeelingsChallenge या हॅशटॅगअंतर्गत मुंबई पोलिसांनी ही मोहीम  सुरू केली आहे. मुंबई पोलिसांनी यांसंदर्भात ट्विटदेखील केलं आहे. किकी चॅलेंज करणाऱ्यांच्या जीवाला तर यामुळे धोका आहेच. पण यासोबतच दुसऱ्यांच्या जीवाला देखील यामुळे धोका उद्भवू शकतो. त्यामुळे अशा चॅलेंजच्या माध्यमातून लोकांना त्रास देणं थांबवलं नाही तर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं अाहे.

लोकांना अशाप्रकारच्या चॅलेंजच्या माध्यमातून त्रास द्यायचे थांबवा नाहीतर कारवाईसाठी तयार राहा’ अशा अाशयाच्या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांनी #DanceYourWayToSafety आणि #InMySafetyFeelingsChallenge हे हॅशटॅग वापरले आहेत. 


हेही वाचा -

आता व्हॉट्सअॅपवर करा गृप व्हिडिओ कॉल

बिअरनंतर घ्या 'टॅप वाईन'चा आस्वाद!


पुढील बातमी
इतर बातम्या