Advertisement

बिअरनंतर घ्या 'टॅप वाईन'चा आस्वाद!

जगभर वाईनचे चाहते आहेत. वाईनची वाढती क्रेझ लक्षात घेऊन मुंबईत 'वाईन व्हिला' हे नवे रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं आहे. वाईन आणि पदार्थांचं योग्य कॉम्बिनेशन फार महत्त्वाचं आहे. याचीच सांगड तुम्हाला इथं पाहायला मिळेल. भारतीय पदार्थांचा विचार करूनच इथला मेन्यू तयार केला जातो. इथले पदार्थ विदेशी असले तरी त्यांना देसी तडका देण्यात आला आहे.

बिअरनंतर घ्या 'टॅप वाईन'चा आस्वाद!
SHARES

वाईन हा प्रकार भारतात हळूहळू रूजू लागला आहे. तसं बघायला गेलं तर वाईन संस्कृती भारतात फार उशीरा आली. पण वाढत्या पर्यटनामुळे का होईना पण वाईन संस्कृती आता लोकप्रिय होऊ लागली आहे. जगभर वाईनचे चाहते आहेत. वाईनची वाढती क्रेझ लक्षात घेऊन मुंबईत 'वाईन व्हिला' हे नवे रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं आहे.



फ्लेवर्स ऑफ वाईन

तुम्हाला इथं जवळपास १०० वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या वाईनचा आस्वाद घेता येणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत फक्त बिअर टॅप करून मिळायची. पण आता पहिल्यांदाच मुंबईत टॅप वाईन देखील मिळणार आहे. महाराष्ट्रात नाशिक इथं वायनरी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सुला वाईन अनेकांनी ट्राय देखील केली असेल. पण इथं तुम्हाला टस्कनी, चिलीमधील मॅपीओ व्हॅली, अर्जेंटिनातील मेंडोझा आणि फ्रान्समधील रोन व्हॅली इथल्या वायनरीतील वाईन तुम्ही ट्राय करू शकता.

आता टॅप वाईन

वाईन आणि पदार्थांचं योग्य कॉम्बिनेशन फार महत्त्वाचं आहे. याचीच सांगड तुम्हाला इथं पाहायला मिळेल. भारतीय पदार्थांचा विचार करूनच इथला मेन्यू तयार केला जातो. इथले पदार्थ विदेशी असले तरी त्यांना देसी तडका देण्यात आला आहे.

सौजन्य

इथं जसी बिअर टॅप करून दिली जाते, तशीच वाईन देखील टॅप करून दिली जाते. मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया या शोच्या ९व्या पर्वाची विनर डायना चॅन यांची ही संकल्पना आहे.

वाईनचा आस्वाद घ्यायचा असेल वाईन व्हिलाला नक्की भेट द्या.

कुठे : तिसरा मजला, ३७, हॉरीजॉन, जुहू चर्च रोड, जुहू

संपर्क : ९१६७६४७७१९



हेही वाचा-

वाईन अॅण्ड डाईन! वाईन इज शाईन!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा