Advertisement

रील बनवण्यासाठी लोकलवर दगडफेक?

तरुणाचा VIDEO व्हायरल; RPFकडून कारवाई

रील बनवण्यासाठी लोकलवर दगडफेक?
SHARES

रील बनवण्याच्या नादात रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दिघा येथील या तरुणावर सानपाडा RPFने रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा तरुण रेल्वे रुळाजवळ उभा असल्याचं दिसतं. समोरून जाणाऱ्या मुंबई लोकलच्या दिशेने दगड फेकण्याचा प्रयत्न करताना आणि प्रवाशांना अश्लील हावभाव करताना तो दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

मात्र पोलिसांनी ओळख पटवल्यानंतर या तरुणाने सोशल मीडियावर माफीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हात जोडून त्याने आपली चूक मान्य केली.

“व्हायरल झालेला व्हिडिओ फक्त रीलसाठी बनवला होता. मी प्रत्यक्षात लोकलवर दगड फेकला नाही. दगड बाजूला फेकला आणि लोकलवर फेकत असल्याचं फक्त अभिनय केला,” असा दावा त्याने माफीच्या व्हिडिओमध्ये केला.

तसंच, “पुन्हा अशी चूक होणार नाही, मला माफ करा,” असं म्हणत त्याने माफी मागितली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ ठाणे रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर तरुणाची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर RPF सानपाडाकडून रेल्वे कायद्यातील संबंधित कलमांनुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या घटनेत प्रत्यक्षात कोणत्या लोकलला किंवा प्रवाशांना लक्ष्य करण्यात आलं होतं का, तसेच कोणाला धोका निर्माण झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत.

सोशल मीडियावर व्ह्यूज आणि लाइक्स मिळवण्यासाठी रेल्वे रुळांजवळ धोकादायक स्टंट करण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र चालत्या लोकलवर दगड फेकण्याचा प्रयत्नही प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या रील्ससाठी धोकादायक कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

Rapido चालकांसाठी मराठी शिकण्याची सुविधा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा