Advertisement

वाईनचे ३०० प्रकार आणि सोबत क्रॅब पकोडा!


वाईनचे ३०० प्रकार आणि सोबत क्रॅब पकोडा!
SHARES

बिअर आणि दारूच्या जगात आजही वाईननं आपलं नावीन्य हरवलेलं नाही. वाईन ही जेवणाची चव वाढवते. प्रत्येक टेबलाची शोभा वाढवते. एका ग्रीक कवीनुसार वाईन मनाचा आरसा आहे. अशाच या वाईनचे दोन प्रकार असतात. ते म्हणजे रेड आणि व्हाईट वाईन. हे बहुतेक सर्वांनाच माहीत असेल. पण आम्ही तुम्हाला वाईनचे ३०० प्रकार असतात असं सांगितलं तर? तुम्ही देखील चकित झालात ना? वाईनचे चक्क ३०० प्रकार? तुम्हाला वाईनचे जास्तीत पाच सहा प्रकार माहीत असतील. पण आम्ही तुम्हाला अशा जगात घेऊन जाणार आहोत जिथे ३०० प्रकारच्या वाईनची चव तुम्ही चाखू शकता!



इथं मिळतात ३०० प्रकारच्या वाईन!

तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारच्या आणि ब्रँडच्या वाईन ट्राय करायच्या असतील, तर तुम्ही लोअर परेल इथल्या फिनिक्स मॉलमधल्या 'द वाईन रॅक'ला भेट द्या. 'द वाईन रॅक' या रेस्टॉरंटमध्ये ३५ देशांमधून मागवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन आहेत.



हटके डिशेसची खासियत

फक्त वाईनच नाही, तर तुम्ही इथं वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. ऑस्ट्रेलिया मास्टर शेफ सारा टॉडनं या रेस्टोमधला मेनू ठरवला आहे. भारतीय आणि परदेशी स्ट्रीट फूडपासून प्रेरीत होऊन सारा टॉडनं या रेस्टोमधला मेनू ठरवला आहे.



डक कुलचा आणि क्रॅब पकोडा या दोन हटके डिशेस या रेस्टॉरंटची खासियत आहेत. डक हे आपल्या इथं खाल्लं जात नाही. पण या रेस्टोमध्ये डक मीट हे कुलचामध्ये स्टफ करून दिलं जातं. शिवाय इथला चीझ बोर्ड आणि क्रस्ट पिझ्झा या दोन डिशेस वाईनसोबत खाण्याची मजाच काही और आहे!



या रेस्टोची सजावट देखील सुंदर आणि आकर्षक अशी आहे. रेस्टोमध्ये रॅकवर सजवण्यात आलेल्या वाईनच्या बॉटल्स आणि सुंदर असे नक्षीकाम यामुळे रेस्टोरंटला वेगळाच लूक येतो. रेस्टोचा लूक पाहून तुम्ही फोटो काढण्यापासून स्वत:ला रोखूच शकणार नाहीत! त्यामुळे तुम्ही वाईनप्रेमी असाल, तर या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा