व्हिलन्स ऑफ बॉलिवूड अंडर अरेस्ट!

'मोगॅम्बो नाखूष हुआ’ बोलणारे अमरीश पुरी, 'सारा शहर लॉ अॅण्ड ऑर्डर को मानता है’ असं आपल्याच स्टाईलमध्ये बोलणारे अजित, हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा व्हिलन मानला जाणारा गब्बर बोलतो, 'आदमी एक पुलिस तेज, बोहोत नाइन्साफी है' तर चित्रपटांमध्ये सर्वात जास्त पोलिसाची भूमिका बजावणारे अमिताभ बच्चन म्हणतात, 'कानून के हाथ लंबे ही नही, तेज है'. नक्की हा काय प्रकार आहे? बॉलिवूडच्या व्हिलन्सचे प्रचलित असे हे डायलॉग मी असे तोडून मोडून का बोलतेय? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडेल असतील. पण या डायलॉग्सचा प्रचार मी नाही, तर खुद्द साकिनाका पोलिसांकडून केला जातोय!

चित्रपटांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढते?

चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या गुन्ह्यांचे प्रकार बघूनच अनेक गुन्हे घडतात, असा गैरसमज आहे. साकिनाका पोलिसांनी यावरच एक युक्ती लढवली आहे. चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या व्हिलनच्या वॉल पेंटिंगच्या माध्यमातून संदेश दिले आहेत.

गुन्हेगारी वाईट आहे, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी साकिनाका पोलिस योग्यप्रकारे पार पाडत आहेत, या आशयाचे संदेश साकिनाका पोलिस स्टेशनच्या वॉलवर पाहायला मिळत आहेत. या संकल्पनेमुळे साकिनाका पोलिस स्टेशनचा कायापालट झाला आहे.

नागरिक सहसा पोलिस स्टेशनला यायला घाबरतात. पोलिस स्टेशनच्या भोवतालचे वातावरण पाहता नागरिकांच्या मनात भिती निर्माण होते. त्यामुळे पोलिस स्टेशनच्या बाह्य भागाचा कायापालट करण्याचा निर्णय आम्ही घेतला. बॉलिवूड थीममुळे नागरिकांना संदेश देणे सोपे झाले, अशी माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी दिली.

पोलिस स्टेशन 'चल रंग दे'!

पोलिसांची ही आयडिया प्रत्यक्षात उतरवण्यामागे हात आहे तो 'चल रंग दे' या टीमचा. घाटकोपरच्या असल्फा व्हिलेजचा 'चल रंग दे' टीमच्या सदस्यांनी कायापालट केला होता. असल्फा व्हिलेज आज वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगून गेलं आहे. याच संकल्पनेवर आधारित साकिनाका पोलिस स्टेशन रंगवण्याची जबाबदारी 'चल रंग दे' टीमच्या सदस्यांनी घेतली. जवळपास ७० सदस्यांनी यात सहभाग घेतला होता.

साकिनाका पोलिस स्टेशन जवळून जाणाऱ्या प्रत्येकाची नजर एकदा तरी या पेंटिंग्सवर जातेच जाते. हे पेंटिंग्स इतके बोलके आहेत की न राहावून मुंबईकर ते पाहाण्यासाठी थांबतात!

 

फोटो सौजन्य


हेही वाचा

चल रंग दे... मुंबईचं रुपडं पालटणार

पुढील बातमी
इतर बातम्या