मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकिनला '४' पर्याय

मासिक पाळी दरम्यान पारंपरिक कापड वापरावे की सॅनिटरी नॅपकिन? याविषयी वेगवेगळी मते आहेत. अगदी सुशिक्षित घरात नॅपकिन सोडून पारंपरिक कापडाच्या घडीकडे वळलेल्या महिला आहेत. मात्र, महाविद्यालयीन मुलींमध्ये नॅपकिन वापराचे प्रमाण ७५ टक्के आहे. पण सॅनिटरी नॅपकिन सोडले तर इतर पर्यायांचा देखील विचार करण्याची आवश्यक्ता आहे. आज आम्ही तुम्हाला याच काही पर्यायांची माहिती देणार आहोत.

) मेन्स्ट्रुअल कप

मेन्स्ट्रुअल कप सिलिकॉन किंवा लेटेक्स रबरापासून बनवलेला असतो. सॅनिटरी नॅपकिन पाळीतला रक्तप्रवाह शोषून घेतात, पण हा कप मात्र पाळीचा रक्तप्रवाह जमा करतो

त्यामुळे कप धुवून त्याचा पुनर्वापरही सहज शक्य असतो. पाळीच्या वेळी हा कप योनीमध्ये बसवतात. त्यानंतर त्यात पाळीचा रक्तप्रवाह जमा होतो.

२) टॅम्पॉन

पाश्चात्य देशांमध्ये प्रचलित असलेला हा प्रकार भारतात फारसा वारपला जात नाही. सॅनिटरी नॅपकिन्ससारखाच काहीसा हा प्रकार. पण पॅडस योनीच्या बाहेर राहून पाळीचा रक्तस्राव शोषतात तर टॅम्पॉन योनीच्या आत घालावं लागतं

याची शोषणक्षमता अधिक असते. त्यामुळे अधिकवेळ वापरूनही त्यातून दुर्गंधी येत नाही. विशेष फिल्डवर काम करणाऱ्या महिला आणि खेळाडू याचा अधिक वापर करतात.

) पिरीयट पँटी

अमेरिकेतल्या काही कंपन्यांनी अशा पँटी बाजारात आणल्या आहेत. त्यांची शोषक्षमता टॅम्पॉन एवढीच, किंबहुना जास्त आहे असा त्यांचा दावा आहे

पाळी दरम्यान फक्त ही पँटी घालायची आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज पडणार नाही या कंपन्यांचं म्हणणं आहे. भारतात तुम्हाला ऑनलाईन अशा पँटी उपलब्ध होतील.

) कापडी सॅनिटरी नॅपकिन्स

कापडाचे सॅनिटरी नॅपकिन हा नवीन प्रकार बाजारात आला आहे. हे सॅनिटरी नॅपकिन्स शिवलेले असतात. त्यामुळे वापरणं अधिक सोप्प जातं. तुम्ही धुवून याचा पुन्हा वापर करू शकता. पण धुतल्यावर स्वच्छ ठिकाणी सुकायला टाकणं आवश्यक आहे.


हेही वाचा

मासिक पाळी..समज कमी, गैरसमज जास्त!

मासिक पाळी दरम्यान वेदना असह्य होतात? मग हे उपाय करा

पुढील बातमी
इतर बातम्या