Advertisement

मासिक पाळी दरम्यान वेदना असह्य होतात? मग हे उपाय करा

पाळी दरम्यान वेदना होत असल्यास शरीराला विश्रांती देण्यासाठी झोप हा चांगला उपाय आहे. झोपल्यानं वेदना जाणवणार नाहीत आणि शरीराला देखील आराम मिळेल.

मासिक पाळी दरम्यान वेदना असह्य होतात? मग हे उपाय करा
SHARES


मासिक पाळी दरम्यान वेदना तर सर्वांनाच होतात. पाच दिवस पोट आणि कंबरेचा भाग प्रचंड दुखतो. मग त्या दरम्यान सुट्टी घेणं काही शक्य नसतं. मग काय दुखणं कमी करण्यासाठी गोळ्यांचा आधार घेतला जातो. पण याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात. यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय अमलात आणाल तर तुम्हाला पाळी दरम्यान नक्कीच बरं वाटेल.

1) पाळीच्या वेळी ओटीपोटाला कोमट तेलानं हलक्या हातानं मालीश करावी. ओटीपोट, कंबर अशा सगळ्या बाजूंनी मालीश करावं. यामुळे शरीराचे काही पॉईंट्स दाबले जातात. मालीश करण्यामुळे वेदना कमी होतात.

2) एखाद्या पेन किलर औषधाप्रमाणे गरम पाण्याच्या पिशवीचा शेक काम करतो. ओटीपोटाचे, कंबरेचे स्नायू आकुंचन पावल्यानं वेदना होतात. तो भाग शेकला गेला की आकुंचन पावलेले स्नायू पूर्ववत होतात.

3) पाळी दरम्यान शरीराला आराम द्यावा असा समज आहे. पण पाळी दरम्यान व्यायाम केल्यानेच तुमच्या वेदना कमी होऊ शकतात. व्यायामामुळे अंग मोकळे होते.

4) व्हिटॅमीन डी ची कमतरता स्त्रियांच्या शरीरात असल्यास पाळीच्या ३ ते ४ दिवस आधीच कंबर, अंग दुखायला लागते. त्यामुळे व्हिटॅमीन डी चे प्रमाण योग्य राखा.

5) पाळी दरम्यान काही ठराविक अन्न पदार्थ टाळावेत. अधिक चरबीयुक्त पदार्थ, चहा, कॉफी, खारट पदार्थ, शीत पेये, दारू यापासून दूर राहावे.

6) तुमच्या आहारात गर्बल टी, बडीशोप, दालचिनी, शेपू इतर हिरव्या पालेभाज्या, चिकन, मासे, अक्रोड, बदाम, पपई, पाणीदार फळे अशा पदार्थांचा जेवणात समावेश करावा.

7) गरम किंवा कोमट पाणी पिण्यानं स्नायूंना आराम मिळतो. त्वचेला रक्तपुरवठा होतो.

8) गरम पाणी जंतुनाशक असते. अशा पाण्यात सुगंधीत द्रव्य घालून अंघोळ केल्यानं प्रसन्न वाटते.

9) मेथीचे लाडू किंवा मेथीचे पाणी पिण्यानं कंबरदुखी, अंगदुखीत आराम मिळतो. मासिक पाळीत मेथीचे सेवन केल्यास वेदनांपासून सुटकारा मिळतो.

10) पाळी दरम्यान वेदना होत असल्यास शरीराला विश्रांती देण्यासाठी झोप हा चांगला उपाय आहे. झोपल्यानं वेदना जाणवणार नाहीत आणि शरीराला देखील आराम मिळेल. रात्री सुद्धा ८ तास झोप पूर्ण झाली पाहिजे याकडे लक्ष द्या.  

तुम्हाला देखील पाळी दरम्यान त्रास होत असेल तर हे उपाय नक्की करून बघा. तरी सुद्धा आराम मिळत नसेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या.



हेही वाचा

मासिक पाळी..समज कमी, गैरसमज जास्त!

एकाच जागी बसून काम करणं घातक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा