Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

एकाच जागी बसून काम करणं घातक

आपल्यापैकी बहुतांश लोकं ही बसल्या जागी काम करतात. पण नऊ-दहा तास एकाच जागी बसण्याचे तोटे देखील अधिक असतात.

एकाच जागी बसून काम करणं घातक
SHARES

दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करायची सवय आपल्या सर्वांनाच असते. फिल्डवरचं काम म्हणजे उन्हा-तान्हात फिरणं. त्यामुळे फिल्डवरचा जॉब नको रे बाबा, अशीच सर्वांची इच्छा असते. उन्हात फिरण्यापेक्षा बसल्या जागी, जास्त काही हालचाल न करता आपल्या समोर असणाऱ्या कम्प्युटरवर फक्त ठाकठाक करायचं. आपल्यापैकी अनेक जण ऑफिसला एकदा गेलं की सरळ संध्याकाळी बाहेर पडतात. म्हणजे आठ ते नऊ तास बसून एकाच जागी काम करतात. पण एकाच जागी काम करणं आरामदायी असलं तरी आरोग्यदायी मात्र अजिबात नाही. एकाच जागी आठ ते नऊ तास काम करण्याचे तोटे अधिक आहेत. हे तोटे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) खूप वेळ एकाच जागी बसणं आणि शारीरिक हालचाली न करणं यामुळे शरीराच्या आतील कार्यप्रणालीवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे अनेक आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते.

२) तीन तासाहून अधिक काळ एकाच जागी बसून राहत असाल तर हृदयरोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कामातून थोड्या-थोड्या वेळानंतर ब्रेक घेतलाच पाहिजे.

३) एकाच जागी बसून राहिल्यानं डोक्याच्या हिप्पोकॅम्पस या भागावर त्याचा विपरित परिणाम होतो. या भागाला मानवी शरिरातील मेमरी संबोधले जाते. शरीरातील हालचाल न झाल्यानं हिप्पोकॅम्पस आकुंचन पावते आणि त्याचा आकार कमी होतो. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती कमी होते.

४) तासनतास बसून राहिल्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे पायांच्या खालच्या भागात सुज येण्याची शक्यता उद्भवते. हा त्रास होणारी व्यक्ती रात्री झोपल्यानंतर सुज मानेपर्यंत पोहचते. यामुळेच घोरण्याची समस्या निर्माण होते.

५) बऱ्याचदा डेस्कवरच लंच केले जाते. डेस्कवर लंच केल्यानं कॅलरी बर्न होऊ शकत नाहीत. शरीरात फॅट सेल्सचे प्रमाण दुपटीनं वाढते. बसताना किंवा झोपताना फॅट सेल्सवर वजन पडले तर ट्रायग्लेस राइडचे प्रमाण वाढते. अशा व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता निर्माण होते.

६) दिवसभर बसून काम करण्यामुळे पल्मोनरी इंबोलिज्म अर्थात फुफ्फूसामध्ये ब्लड क्लॉटिंग होण्याची शक्यता असते. यामुळे ब्लड सर्क्युलेशनची गती मंदावते.

७) जेवणानंतर शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे जेवण झाल्याबरोबर खुर्चीत बसल्यानं कॅलरी वाढतात. याचा परिणाम असा होतो की, व्यक्तीमध्ये लठ्ठपणा वाढतो. यामुळे टाईप २ डायबटीजचीही शक्यता वाढते.

८) सात-आठ तास एकाच जागी बसून काम केल्याचा परिणाम तुम्हाला आता जाणवणार नाही. काही वर्षांनंतर तुम्हाला या समस्यांचा सामना करावा लागेल.

९) या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर जेवणानंतर खुर्चीत बसून नये. थोडा वेळ चालावं. कामाच्या ठिकाणी अर्धा-अर्धा तासानं दहा मिनिटं तरी जागेवर उभं राहावं.


हेही वाचा

पुश-अप्स मारताना करू नका या ९ चुका

'हे' ७ व्यायाम प्रकार तुमचं आयुष्य करतील सुखकर
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा